<a href="https://ift.tt/mPN0Tnf Biparjoy Latest Update : बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert To Gujarat Coast) जारी करण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्ट ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बिपारजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy Latest Update) 15 जूनच्या संध्याकाळी ताशी125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे. मुंबई किनारपट्टी भागात बुधवारी देखील वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किलोमीटर दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत.

10.45pm:Orange Msg for Saurashtra Kutch coast🌀
ESCS Biparjoy 400km SSW of Jakhau Port,likly to cross Saurashtra-Kutch adj Pakistan coasts betn Mandvi (Guj) & Karachi (Pak) near Jakhau Port (Guj) by 15 Jun evening as Very Severe CS with max winds 125-135 kmph gusting 150.
IMD pic.twitter.com/8r4riihHit
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 12, 2023

जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बिपारजॉयचं लॅंडफॉल 15 जून रोजी झाल्यानंतर गुजरात, राजस्थान आणि दिल्लीपर्यंत त्यापुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला असलेला संभाव्य धोका टळला आहे. हे चक्रीवादळ मुंबईला समांतर राहात गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. त्यामुळं गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला या चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराचीदरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

Nowcast Warning,12/06 19:05Hrs
Thunderstorm,lightning,Gusty winds (30-40 kmph) very likly to occur at isol stns ovr Yavatmal,Chandrapur,Gadchiroli next 3 hrs
Light rain vry likly to occur at isol places ovr Nagpur,Amravati,Wardha, Chandrapur,Gadchiroli,Bhandara, Yavatmal,Washim pic.twitter.com/PwQNqb6Xgx
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 12, 2023

ही बातमी वाचा :

<a href="https://ift.tt/zhGpA49 Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे काही उड्डाणं रद्द तर काही विलंबाने

Cyclone Biparjoy : अरबी समुद्राला उधाण... बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने; मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना
जून १३, २०२३
0
Tags