मल्टिस्टेटची शाखा उघडलेच नाही आणि ठेवीदारांची पळापळ
बीड - भरमसाट व्याज दराचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी जमविल्यानंतर मागच्या काही दिवसात बीडमधील जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटमध्ये ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या. मल्टीस्टेटने दिलेले काही धनादेश देखील बाउंस झाले आणि त्यातच शनिवारी मल्टिस्टेटची शाखा देखील उघडलेच नाही. त्यामुळे जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटच्या ठेवीदारांची पळापळ सुरु झाली असून काही ठेवीदारांनी पोलिसांकडेही धाव घेतली आहे. दरम्यान मल्टिस्टेच्या वतीने शाखेच्या बाहेर 'सर्वांचे पैसे मिळतील, कोणी अफवांना बळी पडू नये' असा फलक लावला असला तरी ज्यांच्याकडे पाहून ठेवी दिल्या तेच नॉट रिचेबल झाल्याने ठेवीदार मात्र अस्वस्थ झाले आहे.
बीड जिल्ह्यातील कमी कालावधीत भरपूर ठेवी जमविणारी मल्टीस्टेट अशी ओळख असलेल्या जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटच्या ठेवी मिळण्यात मागच्या काही दिवसांपासून अडचण येत असल्याची चर्चा होती. या मल्टिस्टेटने ठेवीदारांना इतरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर व्याज दिल्याने ठेवी ठेवण्यासाठी या मल्टिस्टेटकडे ग्राहकांचा ओढा होता. मल्टिस्टेटचे कर्तेधर्ते असलेल्या बबनराव शिंदे यांचे बाजारपेठेत मोठे प्रस्थ असल्यानेही अनेकांनी या ठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या. मात्र मागच्या काही दिवसात ठेवी मागायला गेलेय ठेवीदारांना काही रक्कम रोख घ्या आणि काही रकमेचा धनादेघ्या असे सांगण्यात आले. त्यातच काहींना दिलेले धनादेश देखील वाटले नाहीत. त्यामुळे ठेवीदार अस्वस्थ असतानाच शानिवारी सकाळी मल्टिस्टेची बीडमधील शाखाच उघडली नाही. सकाळपासूनच ग्राहकांनी शाखेच्या भर गर्दी केली होती, मात्र शाखा उघडली नाही. काहींनी कर्तेधर्ते बबनराव शिंदेंना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील नॉट रीचेबल आहेत. शाखा बंद, ज्यांच्या भरवशावर ठेवी ठेवल्या ते संपर्कात नाहीत, त्यामुळे ठेवीदारांचे अवसान गळाले असून त्यांची धावाधाव सुरु झाली आहे. काहींनी थेट पोलिसात धाव घेतली आहे.