PM Modi US Visit:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्हाईट हाऊसवर (White House) भाषण केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'भारत आणि अमेरिकेचे संबंध हे जगासाठी फार महत्त्वाचे आहेत.' तसेच पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आजच्या चर्चेमध्ये घेण्यात आलेले निर्णय हे आमच्या जागतिक धोरणात्मक संबधांच्या महत्त्वपूर्ण अध्यायाशी जोडले गेले आहेत.'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एअर इंडियाच्या कराराचा देखील उल्लेख केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'आता आम्ही मिळून अमर्याद भविष्यासाठीचे दरवाजे उघडणार आहोत. तसेच एअर इंडियाकडून बोईंग विमान खरेदी करण्याच्या करारामुळे अमेरिकेत दहा लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.'

आम्ही आर्टेमिस करारात सहभागी होण्यास तयार - मोदी

अमेरिका आणि भारताच्या अंतराळ मोहिमांविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, 'आम्ही आर्टेमिस करारामध्ये सहभागी होण्यास तयार आहोत. तसेच पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, याचबरोबर आम्ही अंतराळाच्या क्षेत्रात एक नवी भरारी घेतली आहे. आजचा दिवस हा भारत आणि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं. '

अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर पंतप्रधानांचे भाष्य

पंतप्रधान मोदी यांनी या संयुक्त पत्रकार परिषेदमध्ये भारतातील अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, 'भारत आणि अमेरिकेच्या रक्तामध्ये लोकशाही आहे. भारतात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. भारतात सगळ्यांच्या सोबतीने आणि विश्वासाने काम केले जाते.' पुढे बोलतांना पंतप्रधानांनी म्हटलं की, 'व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भारतीय हे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांची ताकद आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेंगळुरू आणि अहमदाबाद येथे वाणिज्य दूतावास उघडण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये आज द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये त्यांनी यु्क्रेन आणि रशियामधील युद्धासंदर्भात चर्चा केली. तसेच भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही जगातील सर्वात परिणामकारक भागीदारी असणार आहे. भारत-अमेरिका मैत्रीसंबंध हे इतिहासातील सर्वात मजबूत, जवळची आणि प्रगतशील भागीदारी असणार आहे. असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/H38iY21 Modi US Visit: 'हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान', व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण

PM Modi US Visit: 'आरटमस कररत सहभग हणर' पतपरधन मद आण रषटरधयकष बयडन यच सयकत पतरकर परषद
जून २३, २०२३
0
Tags