Type Here to Get Search Results !

Bhandara Viral Video: भंडाऱ्यातील मंदिरात महादेवाचा नंदी पितोय दूध आणि पाणी; व्हायरल व्हिडिओमुळे मंदिरात नागरिकांची तुफान गर्दी

<a href="https://ift.tt/MGkV9Dm Viral Video: भंडारा (Bhandara) शहरासह जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील मंदिरातील (Temple) नंदी अचानक दूध आणि पाणी पिऊ लागल्याची अफवा पसरली आहे.  नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं ही दैवी चमत्कार सिद्ध करुन दाखवा असा दावा देखील केला आहे. तसेच हा दैवी चमत्कार सिद्ध करणाऱ्या 21 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे.

भंडारा शहरालगत असलेल्या कृषी कॉलोनी येथील हनुमान मंदीरासह तुमसर आणि मोहाडी येथील मंदिरात ही घडली आहे. काही वर्षांपूर्वी गणपती दूध पित असल्याची अफवा पसरली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या व्हिडीओवर अनेक प्रकराच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उमटत आहेत. या व्हिडीओला कोणी श्रद्धेचं नाव देत आहे तर कोणी अंधश्रद्धेचं नाव या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

श्रावण महिन्याला आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे भंडाऱ्यातील  तुमसर आणि मोहाडी तालुक्यातही भाविकांची रेलचेल होती. तेव्हा काही भाविकांनी शंकराच्या पिंडीसमोर असणाऱ्या नंदीला चमाच्याने पाणी पाजले. तेव्हा नंदीनं ते पाणी पिल्याचा समज नागरिकांचा झाला. त्यानंतर हा एक दैवी चमत्कार असल्याचं काही जणांना वाटू लागलं. त्यामुळे अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

हा व्हिडीओ व्हायरल होताच आता दगडाचा नंदी दूध आणि पाणी पित असल्याच्या अफवा या जिल्ह्यात पसरू लागल्या आहेत. याच अफवांमुळे आता अनेक जणांनी हा चमत्कार पाहण्यासाठी मंदिरात झुंबड लावली आहे. नंदी दूध आणि पाणी पीत आहे, हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं जात आहे.  तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा दैवी चमत्कार असल्याचं सिद्ध करावं असं सांगण्यात येत आहे.

श्रावण मासारंभात भंडारा जिल्ह्यात ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ सुरु झाला आहे. यामध्ये अनेक भाविक विनाकारण भरडले जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा व्हिडीओवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर यासंदर्भात  अंधश्रद्धा निर्मुलन समिती काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा :

काशीची गंगा विठुरायाला आणि विठूरायाची चंद्रभागा काशी विश्वेश्वराला अर्पण करणार, काशी जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी पंढरपुरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.