TEST CENTURY ON DEBUT FOR YASHASVI JAISWAL : युवा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माच्या साथीने यशस्वी जयस्वालने शतकाला गवसणी घातली. यशस्वीने 215 चेंडूत शतकाला गवसणी घातली. या खेळीत यशस्वीने 11 चौकार लगावले आहेत. पदार्पणात विदेशात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल दहावा भारतीय फलंदाज झालाय.
Oh YEShasvi! 👏 👏
A HUNDRED on debut! 💯
What a special knock this has been! 🙌🙌
— BCCI (@BCCI) July 13, 2023
A dream debut! 💯
— ICC (@ICC) July 13, 2023
पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल दहावा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या आधी हा पराक्रम रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि श्रेयस अय्यर यांनी असा विक्रम केला आहे.
पदार्पणात कुणी कुणी शतक ठोकले -
यशस्वी जयस्वाल 2023, वेस्ट इंडिज - विदेशात
श्रेयस अय्यर 2021, न्यूझीलंड, मायदेशात
पृथ्वी शॉ 2018, वेस्ट इंडिज - मायदेशात
रोहित शर्मा 2013, वेस्ट इंडिज, मायदेशात
शिखर धवन 2013, ऑस्ट्रेलिया, मायदेशात
सुरेश रैना 2010, श्रीलंका, विदेशात
विरेंद्र सेहवाग 2001, दक्षिण आफ्रिका, विदेशात
सौरव गांगुली 1996, इंग्लंड, विदेशात
प्रविण आमरे 1992, दक्षिण आफ्रिका विदेशात
मोहम्मद अझरुद्दीन 1984, इंग्लंड, मायदेशात
पदार्पणाआधी यशस्वी जयस्वालची कामगिरी -
यशस्वाली जयस्वाल याने 2019 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले, आतापर्यंत झालेल्या 15 सामन्यातील 26 डावात त्याने 80.21 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 2 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याशिवाय 32 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 54 च्या सरासरीने 1511 धावांचा पाऊस पाडलाय, त्यामध्ये पाच शतके आणि सात अर्धशतके झळकावली. 57 टी 20 सामन्यात 30 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राईक रेटने त्याने 1578 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके ठोकली आहे.
आयपीएलमध्येही यशस्वी जयस्वाल याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 2020 मध्ये राजस्थानने यशस्वी जायस्वाल याला 2.4 कोटी रुपयात खरेदी केले होते. आतापर्यंत 37 सामन्यात त्याने 33 च्या सरासरीने आणि 149 च्या स्ट्राईक रेटने 1172 धावा काढल्या आहेत.
यशस्वी जयस्वाल याने विजय हाजरे ट्रॉफी आणि ईरानी चषकात द्विशतक झळकावले आहे. 2019 च्या विजय हजारे चषकात त्याने 203 धावांची खेळी केली होती. 2022-23 मध्ये मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या ईरानी चषकातील सामन्यात 213 धावांची खेळी केली होती.
यशस्वी भव! पदार्पणताच यशस्वीने झळकावले शतक, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
जुलै १४, २०२३
0
Tags