Fictional Websites : जादूचे मुव्हीज आणि सीरिज पाहिले की मन अगदी आश्चर्याने भरून जाते. हे असे कसे होत असेल? केवळ जादूच्या छडीने माणूस कसे काय गायब होऊ शकतो किंवा झाडूवर बसून मंत्र म्हणला की कोणी कसे उडेल? हे खरेच शक्य असेल का? असे किती प्रश्न मनात येत राहतात.

सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात लोक केवढे काही अविष्कार करत आहेत. या नवीन तंत्रज्ञानामुळे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे सिनेमे देखील बनवले गेले. हॅरी पॉटर , गेम ऑफ थ्रोन्स हे असे चित्रपट आहेत. ज्यांची क्रेझ आजही तरुणाईमध्ये पाहायला मिळते. याच चित्रपटांच्या फॅन्सच्या मनातून यातील वेगवेगळी पात्र जाऊ नयेत म्हणून या सिनेमांवर आधारित वेबसाइट्स आता उपलब्ध केल्या आहेत. वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा अद्भुत मिलाफ साधणाऱ्या कथा म्हणजे तरुणाईला खूप आवडणारं फिक्शन. ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. यापुढे जाऊन त्याच्या वेबसाइट्सही तुफान लोकप्रिय झाल्या आहेत. या पुस्तकांच्या लेखकांकडून किंवा फॅन्सकडून या वेबसाइट्स सुरू करण्यात आल्या आहेत. या वेबसाइट्सवर सतत अपडेट्स येत असतात. त्यावर फक्त ऑनलाइन सिनेमे, पुस्तकांपलिकडे जाऊन त्या लेखकाविषयी माहिती, कथेमागची कल्पना, वाचकांसाठी स्पर्धा, त्या पुस्तकाचा इतिहास, आवडत्या पात्राचा वाढदिवस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धडाकेबाज चॅम्पियनशिप्स अशा भन्नाट गोष्टी अनुभवायला मिळतात. सिनेमा-पुस्तकांशी संबंधित आगामी इव्हेंट्स, शॉपिंग या गोष्टीही असतात. यावर तुम्ही तुमचं अकाउंट ओपन केलं की सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाऊसमध्ये तुम्ही निवडले जाता. तुम्हाला स्वतःची छडी, एक पाळीव प्राणी ही दिला जातो. लेखिकेचे पुढील लेख तसंच हॅरी पॉटर जगातला पेपर 'द डेली प्रोफेटस' ही वाचू शकता. जादूच्या वर्गात बसून हॅरी पाॅटर मधील विविध मंत्रांचा अभ्यास करू शकता. वर्षाखेरीस तुम्हाला यावर आधारित पॉइंट्स दिले जातात. अशाप्रकारे हाऊसचा स्कोअर काढून चॅम्पियन घोषित केले जातात. यावर व्हिडिओ, फोटो गॅलरी देण्यात आली असून यासाठी फॅन्सचीच मदत घेतली जाते. इथे तुम्ही एखाद्या ‘गेम ऑफ थ्रॉन्स’मधल्या पात्रांबरोबरचे किंवा इव्हेंट संबंधित फोटोज, व्हिडिओज तसेच मॅगझिन आर्टिकल्स शेअर करु शकता. व्ह्यूअर्स गाइडमध्ये तुम्हाला हाऊस आणि महत्वाच्या पात्रांबद्दल माहिती, कथे मधल्या ठिकाणांचा नकाशा या गोष्टीही उपलब्ध आहेत. याशिवाय अपकमिंग इव्हेंटसचे अपडेटसही तुम्हाला इथे मिळतात. फॅन्सना अधिकाधिक उपक्रमांत सहभागी करुन घेण्यासाठी 'स्टोरीटेलर कॉम्पिटिशन' यासारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये जिंकणाऱ्यांना आवडत्या पात्रांना भेटण्याची संधीही मिळते.

मला वाटते मूवीज पाहून जेवढे छान वाटते. त्याही पेक्षा जर ते प्रत्यक्षात अनुभवता येत असेल तर एक वेगळीच मज्जा असते. या वेबसाईटवर मला अनेक इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. एखादी मूवी बनविण्यासाठी केवढा उपद्व्याप असतो हे समजले. असे नवनवीन प्रयोग तरुणाईसाठी करत राहिले पाहिजे - रोहन कुलकर्णी

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/ksZvBQN Bhaari Deva : 'सैराट' अन् 'वेड'च्या तोडीसतोड 'बाईपण भारी देवा'! लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा

E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व
जुलै २२, २०२३
0
Tags