Type Here to Get Search Results !

Lok Sabha Elections: आज लकसभच नवडणक झल तर बहरच चतर कय असणर? सरवकषणत नतश कमर- तजसव यदव यच बज क धकक?

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बिहार (Bihar Loksabha Election Survey) सध्या खूप चर्चेत आहे. मुख्यमंत्री नितीश यांच्या नेतृत्वाखाली 23 जून रोजी पाटणा येथे देशभरातील सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांची काय रणनिती असावी यावर खलबतं झाली. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव कसा करता येईल याचा एक कच्चा आराखडा तयार केल्याची माहिती आहे. भाजपनेही बिहारमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान 'टाइम्स नाऊ नवभारत' या टीव्ही वाहिनीने लोकसभा निवडणुकीसाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एनडीए आणि महाआघाडीला किती जागा मिळाल्या ते पाहू.

सर्वेक्षणात जनतेला प्रश्न विचारण्यात आला होता की, आज लोकसभा निवडणूक झाली तर बिहारमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता येतील. सर्वेक्षणातील आकडेवारी धक्कादायक आहे. सर्वेक्षणानुसार, बिहारमध्ये एनडीएला 22 ते 24 जागा मिळू शकतात, तर महागठबंधनबाबत बोलायचे झाल्यास 16 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. एकही जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकत नाही. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत.

सध्या देशात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी संपूर्ण देशाच्या नजरा बिहारकडे लागल्या आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी गट तयार करण्यात गुंतले आहेत. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार दिल्यास भाजपला ते जड जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार याच सूत्रावर काम करत आहेत. यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांची बैठकही झाली आहे. त्याचवेळी या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही कंबर कसली असून बिहारमध्ये पूर्ण ताकद लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील सतत बिहार दौऱ्यावर आहेत.

बिहारमध्ये सध्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासमोर भाजपचं कडवं आव्हान असल्याचं दिसून येतंय.

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

एनडीएला 22 ते 24 जागा मिळू शकतात.

महाआघाडीला 16 ते 18 जागा मिळू शकतात.

इतरांना 0 जागा मिळण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/c9UyXKE Election Survey: आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील? सर्व्हेमध्ये 'या' पक्षाचं होणार सर्वाधिक नुकसान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.