Type Here to Get Search Results !

Matru Suraksha Din 2023 : आज 'मत सरकष दन'..य दवसच सरवत नमक कश झल? वच सवसतर इतहस

Matru Suraksha Din 2023 : जगभरात आज मातृ सुरक्षा दिन (Matru Suraksha Din) हा दिन साजरा केला जातोय. माता आणि होणाऱ्या मातांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा दिवस साजरा करण्याची सुरूवात केली. 2005 सालापासून 10 जुलै सगळीकडे मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा कऱण्यामागचा हेतू म्हणजे मातांचे आरोग्य आणि मातृत्वादरम्यान मातांची काळजी घेणे किती गरजेचं आहे हा आहे.

अनेकदा डिलीव्हरीदरम्यान तसेच डिलीव्हरीनंतर मातांची योग्य ती काळजी घेतली जात नाही. अनेकदा त्यांनी तब्येतीकडे केलेले दुर्लक्ष मातांच्या जीवावरही बेतू शकते. मातांच्या आरोग्याबाबत जनजागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान, 10 जुलै ही तारीख निवडण्यामागचं कारण म्हणजे दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 11 जुलैला जगभरात 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा केला होता.

मातृ सुरक्षा दिन (Matru Suraksha Din) आणि लोकसंख्या दिन या दोघांचाही एकमेकांशी संबंध आहे. कारण मातृ सुरक्षा दिनामध्ये मातेच्या पोटी जन्म घेणाऱ्या दोन अपत्यांमध्ये योग्य ते अंतर असणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले आहे. जर दोन मुलांच्या जन्मादरम्यान योग्य अंतर राखले गेले नाही तर मातेचे तसेच बाळाचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. तिचे आरोग्य चांगले राहिले तर भविष्यात बाळाचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे ही तारीख निवडण्यात आली.

अनेकदा डिलीव्हरीदरम्यान मातांना असलेल्या ब्लड प्रेशर तसेच हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचा धोका वाढतो. अनेकदा बाळाच्या जन्मादरम्यान खूप रक्तस्त्राव झाल्याने तसेच रक्तदाब नियंत्रित न राहिल्याने मातांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी गर्भवती असताना होणाऱ्या मातेने आपली योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गर्भारपणात योग्य काळजी घेतली नाही तर प्रसूतीदरम्यान मातांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

गेल्या काही वर्षांपासून जरी मातांच्या आरोग्याबाबत काळजी घेतली जात असली तरी 2017 मध्ये 2,9500 महिलांनी प्रेग्नंसी तसेच प्रेग्नंसीनंतर आपला जीव गमावला.

दरवर्षी 'मदर्स डे' हा अगदी मोठया उत्साहात साजरा केला जातो. पण, सुरक्षित मातृत्व साजरे करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्यासाठी हा आजचा 'मातृ सुरक्षा दिन' (Matru Suraksha Din) सुद्धा खास आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/tGp8VT1 Days in July 2023 : 'महाराष्ट्र कृषी दिन', 'गुरुपौर्णिमा', 'मोहरम'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.