Skin Care Tips : पावसाळ्यात (Mansoon) विशेषतः त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, त्वचेची काळजी घेताना त्वचेवर साबण लावावा की बॉडी वॉश लावावा हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडतो. बघायला गेलं तर दोघांचेही स्वतःचे वेगवेगळे फायदे आहेत. साबण त्वचेवर <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/HRMQ3rg> साचलेली घाण साफ करण्याचेही काम करते आणि बॉडी वॉशमुळे शरीरावर साचलेली अशुद्धताही साफ होते. चला तर मग जाणून घेऊया साबण त्वचेसाठी फायदेशीर आहे की बॉडी वॉश.
आजही लोक साबणच <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/vnwS3La> वापरतात. ते फक्त अंघोळ करताना किंवा हात धुताना साबण वापरतात. साबण वापरण्यामागचे एक कारण म्हणजे त्याचा सुगंध तीव्र असतो, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ ताजेतवाने वाटू शकते. पण अनेक वेळा साबणाच्या अतिवापरामुळे त्वचा कोरडी होते.
- आंघोळीच्या साबणात सोडियम लॉरील सल्फेट नावाचे रसायन असते, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/Cf9e6sb Skin) होऊ शकते. साबणाच्या अतिवापरामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. याशिवाय, साबण कमी स्वच्छ मानला जातो कारण तो उघडा राहतो, जो अनेक जीवाणूंच्या संपर्कात येऊ शकतो.
- मात्र, साबणासोबतच लोक बॉडी वॉशचाही वापर करत आहेत. साबणापेक्षा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. बॉडी वॉशमध्ये साबणापेक्षा चांगली पीएच पातळी असते. याशिवाय यात साबणापेक्षा जास्त मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत.
- आंघोळीनंतर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर सुरू करा. ते त्वचेला आर्द्रता देते. दुसरीकडे, जर तुम्हाला सोरायसिस किंवा मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही सौम्य बॉडी वॉश देखील वापरू शकता.
- बॉडी वॉश द्रव स्वरूपात असतात. यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या इतर कोणालाही पसरत नाहीत. बॉडी वॉश शरीराला मॉइश्चरायझ करते. साबणाने अंघोळ केल्याने शरीरात कोरडेपणा राहतो. तसंच तुमच्यासोबत इतरही तोच साबण वापरतात आणि साबण उघडा राहतो. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. पण बॉडी वॉश पॅकच राहतो आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
- बॉडी वॉशचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बॉडी वॉशमध्ये जंतू जमण्याची शक्यता नसते. बॉडी वॉश हा बाटलीमध्ये असल्याने, बॉडी वॉशमधील द्रवाचा हातांना स्पर्श होत नाही आणि ते वाऱ्यापासून देखील संरक्षित असते. 
इतर महत्वाच्या बातम्या
<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/yAtcEdK Hepatitis Day: दूषित पाणी आणि अन्नामुळे यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णसंख्येत वाढ; 'असा' ठेवा आहार
Skin Care : त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? काय आहे फायदेशीर, जाणून घ्या
जुलै २९, २०२३
0
Tags