मायग्रेनमुळे होणाऱ्या समस्या
संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो. कारण मायग्रेन आणि हृदयविकाराचा झटका या दोन्हीमध्ये रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळे धोका निर्माण होतो. मायोकार्डियल इन्फेक्शन, हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोका देखील असतो.
मायग्रेन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक कसा वाढवू शकतो?
एका संशोधनानुसार, ज्या लोकांना दीर्घकाळ मायग्रेनची (Migraine) समस्या आहे, त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या गंभीर परिस्थितींचा धोका दुप्पट होतो. जर्नल ऑफ न्यूरोलॉजीमध्ये दिलेल्या अहवालानुसार, मायग्रेनवर वेळीच उपचार न केल्यास, घातक इस्केमिक स्ट्रोकचा धोका देखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना मायग्रेन ते गंभीर मायग्रेन आहे त्यांनी आपली जीवनशैली (Lifestyle) सुधारली पाहिजे आणि या समस्येचे लवकरात लवकर निदान करणं गरजेचं आहे.
मायग्रेन कसे कमी करावे?
जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल, तर त्या समस्यांबद्दल जाणून घ्या आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग शोधा. यामध्ये ध्यान करणं हा मायग्रेनवर मात करण्याचा चांगला उपाय आहे.
मायग्रेनची समस्या टाळण्यासाठी सकस आहार घ्या आणि जास्त वेळ उपाशी राहू नका. कारण उपाशी राहिल्याने मायग्रेनची समस्या वाढते.
जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने देखील मायग्रेनचा धोका वाढतो, त्यामुळे चहा, कॉफी आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.
जर तुम्ही हे नियम पाळले तर नक्कीच तुम्हाला मायग्रेन सारख्या समस्येवर मात करता येऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/pbULBuF Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत
Health Tips : तुम्हालाही मायग्रेनची समस्या आहे? मग सावधान! डोकेदुखीमुळे 'या' घातक आजाराचा वाढू शकतो धोका
ऑगस्ट २२, २०२३
0
Tags