Maharashtra Politicis : अजितदादांनी पांढऱ्या दाढीवाल्या 'शकुनी मामा' पासून सावध राहणं गरजेच आहे. हा शकुनी मामा तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. निलेश भोसले (Nilesh Bhosale) यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा स्वभाव महाभारतामधील कर्णासारखा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचे भोसले म्हणाले. पण त्यांनी पांढऱ्या दाढीच्या शकुनी मामा पासून सावध राहवे असे भोसले म्हणाले.

दरम्यान, मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांनी पांढऱ्या दाढीचा 'शकुनी मामा' नेमकं कोणाला म्हटलं ते सांगतिलं नाही. त्यांनी कोणाचही नाव घेतलं नाही. त्यामुळ निलेश भोसलेंचा नेमका रोख कोणाकडं याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अजितदादा पवार यांचा स्वभाव महाभारतामधील कर्णासारखा आहे, पण त्यांनी पांढऱ्या दाढीवाल्या 'शकुनी मामा' पासून सावध राहावे असे भोसले म्हणालेत. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

मा अजित दादा ने पांढऱ्या दाढीवाल्या "शकुणी मामा" पासून सावध राहणं गरजेच आहे, हा शकुणी मामा तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही.#SharadPawar #Beed #NCP #AjitPawar #Maharastra pic.twitter.com/POAsfL05bz
— Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) August 27, 2023

अजित पवारांची बीडमध्ये जाहीर सभा

आज (27 ऑगस्ट) अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांचे बीड जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते उपस्थीत होते. यामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे यासह बीड जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांन जोरदार भाषण केल्याचं पाहायला मिळालं. तर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असेअजित पवार म्हणाले. राजकीय जीवनात चढउतार येतात, त्याना सामोरे जायचं असतं. आम्ही जरी युतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ असे अजित पवार म्हणाले.

साहेब उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांना मान्यता द्या : छगन भुजबळ

राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे आहे आणि अध्यक्ष कोण हे आजची सभा पाहिली तर लक्षात येईल. पक्षाचे अध्यक्ष हे अजित पवार (Ajit Pawar) असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात, दुसरी धनंजय मुंडे, तिसरी हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात झाली. पण ज्यावेळी बारामतीचा विषय आला त्यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत. अजित पवार नेते आहेत म्हणता तर मग उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि भांडण मिटवून टाका असेही छगन भुजबळ म्हणाले. काँग्रेस फुटली त्यावेळी मी शरद पवार यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे नेते मला मुख्यमंत्री करतो असे म्हणाले होते. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यासोबत जाऊ नका. परंतु मी शरद पवार यांच्यासोबत राहील्याचे छगन भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/k7e6Pf0 Pawar : एक लाख कोटी रुपये लागले तरी चालतील पण मराठवाड्याला पाणी देणार : अजित पवार

Maharashtra Politicis : अजितदादांनी पांढऱ्या दाढीवाल्या 'शकुनी मामा' पासून सावध राहावं, अन्यथा....वाचा नेमकं काय म्हणाले निलेश भोसले
ऑगस्ट २८, २०२३
0
Tags