Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने उद्या ( रविवार 27 ऑगस्ट) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेनं प्रवास करण्याआधी प्रवाशांनी मेगा ब्लॉकबाबत माहिती करुन घ्यावी.

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित आगमन वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकापुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर लाईनवर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरता जाणार्‍या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

नेरुळ येथून सकाळी 10.50 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि
ठाणे येथून सकाळी 10.55 ते दुपारी 4.33 पर्यंत नेरुळकरता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहतील.
सकाळी 11.40 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत नेरूळहून सुटणारी खारकोपरची डाउन लाइन सेवा आणि
खारकोपर येथून सकाळी 10.25 ते दुपारी 2.25 पर्यंत नेरूळसाठी सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या BSU लाईन सेवा बंद राहतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.

Mumbai Local Mega Block : उद्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, प्रवासाआधी जाणून घ्या वेळापत्रक
ऑगस्ट २६, २०२३
0
Tags