Type Here to Get Search Results !

Agriculture News : टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म्स USA मधील भारतीय समुहाला संबोधित करणार, सेंद्रिय उत्पादनांचा करणार प्रसार

Agriculture News : सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी दोन बंधूनी एकत्र येत 'टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म्सची' (Two Brothers Organic Farms) स्थापना केली आहे. सत्यजित हांगे आणि अजिंक्य हांगे अशी त्यांची नावे आहेत. हे दोन बंधू त्यांच्या सेंद्रिय उत्पादनांचा विस्तार करत आहेत. आता हे टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म्स यूएसएमधील भारतीय समुहाला संबोधित करणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत यूएसए मधील बाजारपेठेत 50 कोटी अर्थार्जनाचे लक्ष्य आहे. ग्राहक-ते-ग्राहक सेंद्रिय किराणाचा ब्रँड यूएसमध्ये विस्तारीत करण्याचा प्रयत्न आहे.

हांगे बंधू त्यांच्या सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी विस्तार करत आहेत. जसे की प्रक्रिया केलेले तूप, लाकडाच्या घाण्याचे तेल आणि गुळासारखे नैसर्गिक गोड पदार्थ, जे भारतीय आहाराचे लोकप्रिय घटक आहेत. सेंद्रिय शेती, भारताचा खाद्य वारसा आणि निरोगीपणा यावर चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजारपेठा, शाळा आणि घरगुती भेटींमध्ये विविध प्रेक्षकांशी भेटण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या आउटरीचद्वारे, ते आरोग्यदायी मिठाई आणि स्नॅक्स जसे की लाडू, भरडधान्य-आधारित नाश्ता आणि स्नॅक्स आणि शरिराला अपायकारक स्नॅक्सला पर्याय म्हणून नैसर्गिक घटकांपासून बनवलेले न्यूट्री बार यांचा प्रचार करत आहेत. त्यांनी ध्यान आणि योगासंबंधित कार्यशाळांचे नियोजन केले आहे. गुजराती, पंजाबी, तेलुगु, तमिळ आणि इतर अशा विविध भारतीय समुदायांमधील समविचारी व्यक्तींचा समुदाय जोपासण्यासाठी भारतीय पाककला वर्ग आयोजित करणार आहेत. भारतातील अलीकडील तांदूळ आणि गहू निर्यात बंदीबाबतच्या चिंतेचे निराकरण करणे आणि अमेरिकेतील भारतीयांना भरडधान्य पर्याय म्हणून शोधण्यास मदत करणे हे देखील हांगे बंधूचे उद्दिष्ट आहे.

30 ऑक्टोबर पर्यंत हांगे बंधूचा अमेरिका दौरा

हांगे बंधू हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 20 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान सॅन फ्रान्सिस्को, न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी, सॅन जोस, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया आणि ह्यूस्टनला भेट देऊन भारतीय जनसमुहाशी संपर्क साधणार आहेत. कम्युनिटी आउटरीच उपक्रमाद्वारे यूएस मध्ये स्थलांतरित झालेल्या 2.7 दशलक्ष भारतीयांसोबत जोडून ब्रँडची उपस्थिती वाढवण्याचे त्यांचे ध्येय आहे. यूएसए, ऑस्ट्रेलिया, यूके आणि दुबई या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्थलांतरित भारतीयांना सेवा देण्यावर केंद्रित असलेल्या जागतिक विस्तार धोरणाचा एक भाग आहे. 2025 पर्यंत ब्रँड जीएमव्ही GMV चा 20 टक्के हिस्सा ताब्यात घेण्याचे आणि 50 कोटींची विक्री करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

हांगे बंधूंचा हा दौरा 20 सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. हा दौरा 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे. त्यांनी 20 सप्टेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को आणि सॅन जोस येथे त्यांचा आउटरीच सुरु केला आहे. या ठिकाणी अनुक्रमे 25 हजार 130 आणि 72 हजार 660 हून अधिक भारतीय आहेत. ते पुढे 30 सप्टेंबर रोजी लॉस एंजेलिसकडे प्रयाण करतील. या ठिकाणी 100,450 हून अधिक भारतीयांचे वास्तव्य आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी ऑस्टिन, ज्याची भारतीय लोकसंख्या 33,760 आहे. 150,000 भारतीय लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी 11 ऑक्टोबर रोजी ह्यूस्टनला पोहोचतील. हांगे बंधू त्यांच्या या दौऱ्याचा समारोप न्यूयॉर्क शहरात करतील. जिथे ते 18 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत 711,170 हून अधिक भारतीय आणि इतर समुदायांना लक्ष्य करून त्यांच्या आऊटरिच कार्यक्रमाचे आयोजित करतील.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/RlrdhM9 Success Story : सेंद्रीय शेती व उत्कृष्ट गांडुळ खत निर्मिती, दहावी शिकलेल्या शेतकऱ्याने साधला उन्नतीचा मार्ग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.