Amit Shah to Visit Lalbaugcha Raja : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आज मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर अमित शाह सर्वात आधी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) उपमुख्यंत्र्यांसह काही भाजप नेत्यांच्या बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. तर, मुंबई विद्यापीठीत (Mumbai Vidyapeeth) एका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता शाह दिल्लीला रवाना होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दुपारी दोन वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर शाह सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. तिथून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतील, त्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मुंबई विद्यापाठीत एका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता शाह दिल्लीला रवाना होतील.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी लालबागमध्ये उपस्थित असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा लालबागच्या राजाच्या दरबारात 25 मिनटं असणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत.

राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळून सत्तेत शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर गेल्यावर्षी अमित शाह पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हेसुद्धा उपस्थित होते. यंदाही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.

कसा असेल अमित शहा यांचा मुंबई दौरा?

आज दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळ

3 वाजता : लालबाग राजा दर्शन

3.50 ते 4 : वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन

4 ते 4.15 : सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचे दर्शन

4.30 : वांद्रे आशिष शेलार यांचा सार्वजनिक गणपती

5.30 ते 7 : लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रम मुंबई विद्यापीठ येथे

7 वाजता दिल्लीसाठी रवाना

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/8UVsbWd Mumbai News: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले

Amit Shah to Visit Lalbaugcha Raja : अमित शाह आज लालबागमध्ये, लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार, नंतर शिंदे, फडणवीसांच्या बाप्पांचं दर्शन घेणार
सप्टेंबर २३, २०२३
0
Tags