Type Here to Get Search Results !

गतविजेत्याची दमदार सुरुवात, श्रीलंकेनं बांगलादेशच्या टायगर्सला हरवले

BAN vs SL Asia Cup 2023 Match Highlights : गतविजेत्या श्रीलंकेने आशिया चषकाची सुरुवात दिमाखात केली. आपल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशच्या टायगर्सला 164 धावांत रोखले. हे आव्हान श्रीलंकेच्या संघाने 39 षटकात पाच विकेटच्या मोबदल्या सहज पार केले. श्रीलंकेकडून चरिथ असालंका आणि सदीरा समरविक्रमा यांनी अर्धशतकी खेळी केली.

165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. 15 धावांमध्येच दोन विकेट गमावल्या होत्या.  दिमुथ करुणारत्ने आणि पथुम निशांका स्वस्तात माघारी परतले. श्रीलंकेचा संघ अडचीत असताना सदीरा समराविक्रमा आणि कुशल मेंडिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 28 धावांची भागिदारी केल्यानंतर श्रीलंकेला तिसरा धक्का बसला आहे.

11 wins in a row!

This is Sri Lanka's longest winning streak in ODIs 🔥 pic.twitter.com/kqsgplkvMD
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 31, 2023

बांगलादेशचा पराभव करत श्रीलंकेने सलग 11 वनडे सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना रंगतदार झाला. श्रीलंकेने बांगलादेशला 164 धावांत रोखले पण याच धावांचा पाठलाग करण्यासाठी 39 षटके आणि पाच विकेट गमावाव्या लागल्या. एकवेळ बांगलादेशने सामन्यावर वर्चवस्व मिळवले होते. पण चरिथ असालंका आणि समराविक्रमा यांनी श्रीलंकेचा डाव सावरला. कुशल मेंडिस बाद झाल्यानंतर या जोडीने श्रीलंकेच्या डावाचा पाया रचला. यांनी 119 चेंडूत 78 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर श्रीलंकेने सामना जिंकला. समराविक्रमा याने 54 धावांची खेळी केली. समराविक्रमा बाद झाल्यानंतर लंकेला आणखी एक धक्का बसला. बांगलादेशने सामन्यात कमबॅक केले. पण दासुन शनाका याने चरिथख असालंका याला साथीला घेत लंकेला विजय मिळवून दिला.  या दोघांमध्ये 37 धावांची भागिदारी झाली. चरिथ असालंका  याने 92 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून कर्धार शाकिब अल हसन याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. तर तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम आणि मेहदी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

लंकेच्या माऱ्यापुढे बांगलादेशचे टायगर्स फेल -

आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नजमुल याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा बांगलादेश 42.2 षटकात 164 धावांत गारद झाला. नजमुल हसन शांतो याने एकाकी झुंज देत 89 धावांची खेळी केली. नजमुल याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 20 धावासंख्या पार करता आली नाही. श्रीलंकेकडून मथीशा परिराणा आणि महिश तिक्ष्णा यांनी भेदक मारा केला. धोनीच्या चेन्नई संघाचा भाग असणाऱ्या श्रीलंकेच्या या गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. पथिराणा याने बांगलादेशच्या चार फलंदाजांना तंबूत धाडला तर तिक्ष्णा याने दोन विकेट घेतल्या. दुनिथा वेल्लागे, धनंजया डी सिल्वा आणि कर्णधार शनाका यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.