धुळे : मध्यप्रदेश मधून धुळ्याकडे ट्रकमधून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या लाखो रुपयांच्या दारू साठ्यासह शिरपूर पोलिसांनी दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे मद्यतस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पोलिसांनी यावेळी 55.37 लाखांचा दारूसाठा जप्त केला असून तो नेमका कुणाचा आहे आणि कुठे जात होता याचा तपास सुरू आहे.

मध्यप्रदेश येथून शिरपूर मार्गे धुळ्याकडे दारूने भरलेले दोन माल ट्रक येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून सापळा रचला. संबंधित पथकाने शहादा फाट्याजवळ सापळा रचला असता या सापळ्या दरम्यान दोन माल ट्रक येताना दिसले.

पोलिसांनी तात्काळ हे दोन्ही माल ट्रक थांबवून त्यात असलेल्या मालासंदर्भात संबंधित चालकास विचारणा केली असता. त्या चालकांनी त्यावर उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतरर पोलिसांनी या ट्रकमधील सामानाची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी प्रकारचा मद्यसाठा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी हे दोन्ही ट्रक ताब्यात घेतले असून या ट्रक मधून जवळपास 55 लाख 37 हजार 280 रुपये किमतीचा दारुसाठा जप्त केला. हा दारू साठा नेमका कुणाच्या मालकीचा आहे आणि तो कुठे चालला होता याचा तपास शिरपूर पोलीस आता करत आहेत. या कारवाईदरम्यान शिरपूर पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/23fzQel Crime : मुंबईत महिलांची सुरक्षा धोक्यात, धावत्या टॅक्सीमध्ये 14 वर्षीय गतीमंद मुलीवर अतिप्रंसंग, दोन नराधम अटकेत

Dhule Crime : धुळे पोलिसांनी जप्त केला 55 लाखांचा दारूसाठा, सापळा रचून दोन ट्रक घेतले ताब्यात
सप्टेंबर २१, २०२३
0
Tags