Type Here to Get Search Results !

Janmashtami 2023 : जन्माष्टमीच्या दिवशी अनावधानानेही 'या' चुका करुन नका, अन्यथा होऊ शकतं नुकसान

<a href="https://ift.tt/habNsWi 2023 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2023) आहे. भगवान विष्णूने भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्णाच्या रुपात आठवा अवतार घेतला असं सांगितलं जातं. त्यामुळेच दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणून कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. धार्मिक मान्यता आणि धर्मग्रंथानुसार श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. यामुळेच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी 'या' चुका करुन नका

श्रीकृष्णाचे भक्त फक्त भारतातच नाहीत, तर संपूर्ण जगात आहे. अवघ्या जगभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उपवास आणि पूजा करुन भगवान विष्णूचा आशिर्वाद आणि कृपादृष्टी मिळवण्यासाठी भक्तगण प्रयत्न करतात. पण, या दिवशी काही गोष्टींचं भान राखायला हवं. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करुन नका, नाहीतर तुम्हाला याचा त्रास सहन करावा लागेल.

जन्माष्टमी साजरी करताना काही गोष्टी करणं टाळायला हवं. अन्यथा तुम्हाला नुकसान भोगावं लागेल.

चुकूनही तुळशीची पानं तोडू नका. या दिवशी कृष्ण पूजेसाठी तुळशीची पानं हवी असल्यास ती आदल्या दिवशीच तोडून घ्यावीत. जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. कोणतेही झाड तोडू नका.

गोमातेचा अपमान करु नका. गाय किंवा वासराला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका. श्रीकृष्णाला गोमाता अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी गोमातेचा अपमान होईल असं काम करु नका.

मांस, दारु यांचं सेवन करु नका किंवा घरात आणू नका. या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा यांचा वापर करणं टाळा.

कुणाचाही अनादर करु नका. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी धनी किंवा गरीब कोणत्याही व्यक्तीचा अपमान केल्यास भगवान विष्णूंचा कोप होईल.

तांदूळ किंवा भाताचं सेवन करु नका. जन्माष्टमीच्या दिवशी उपवास असेल किंवा नसेल तरी तांदूळ किंवा भाताचं सेवन करणं टाळा.

पूजेला बसताना काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करु नका. या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं.

उपवास असेल तर तो रात्री 12 वाजेनंतरच सोडावा.

ब्रम्हचार्याचं पालन करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/wFeA2hH 2023 : यंदा कृष्ण जन्माष्टमी 6 की 7 सप्टेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.