Type Here to Get Search Results !

Janmashtami 2023 : हाथी, घोडा, पालखी जय कन्हैया लाल की...देशभरात कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

Janmashtami 2023 : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरम्यान, मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि हाच उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा (Shri Krishna) जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात.

श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने घरोघरी बाल गोपाळांचा जन्म झाला आहे. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल कीच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाले आहे. श्रीकृष्णाचा भक्त बालगोपाळांच्या पूजेत तल्लीन असतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होताच घराघरात अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. असं मानलं जातं की ज्या पद्धतीने तुम्ही घरातील लहान मुलाला झोपण्यासाठी अंगाई गाता. त्याचप्रमाणे बाळ कृष्ण गोपाळांनाही एक अंगाई गा. कारण आई यशोदा सुद्धा कान्हाची झोप उडवण्यासाठी लोरी गात असे. लोरीमध्ये तुम्ही भक्तीगीते किंवा फक्त कान्हाची लोरी गाऊ शकता.

विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा

विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी शेकडो विठ्ठल भक्ताने या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यापूर्वी विठुरायाला अनोख्या रुपात सजविण्यात आले होते. डोक्यावर पगडी, अंगावर अंगी, धोतर आणि त्यावर मोठी कुंची घालण्यात आली होती. गुरख्याचे रूप दिलेल्या विठुरायाच्या हातात चांदीची काठी देऊन देवाच्या मागे मोरपिसे लावण्यात आली होती. विठुराया हा विष्णूचा अवतार असल्याने विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो . विठ्ठल सभामंडपात जन्माष्टमीचे कीर्तन सुरू असताना रात्री 12 वाजता पाळण्यात कृष्ण जन्माचा उत्सव करण्यात आला. यावेळी भाविकांनी देवाच्या पायावर गुलाल, अष्टगंध वहात दर्शन घेतले.

जन्माष्टमीची पूजा पद्धत

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो, पूजा केल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो. हे व्रत करणाऱ्याने उपवासाच्या एक दिवस आधी (सप्तमीला) हलके आणि सात्विक अन्नाचं सेवन केलं जातं. संध्याकाळी पूजास्थळी सुंदर देखावे सजवले जातात. देवकीजींसाठी प्रसूतिगृह बांधले जातात. झोपाळ्यावर बाळकृष्णाला बसवलं जातं. देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते. बालगोपाळ सजवला जातो. रात्री 12 वाजता शंख आणि घंटा वाजवून श्रीकृष्णाच्या जन्माचा अभिषेक केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/cRQvtTo 2023 : यंदा कृष्ण जन्माष्टमी 6 की 7 सप्टेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.