Type Here to Get Search Results !

Mega Block : मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉकचा वीकेंड...हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक, शनिवारी शेवटची लोकल रात्री 9 वाजता

मुंबई :  मुंबई मध्य रेल्वेच्या उपनगरीय हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर (वगळून) आणि पनवेल (यासह) दरम्यान अप आणि डाउन मार्गावर दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11 वाजल्यापासून 2 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत 38 तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी सीएसएमटीवरून शेवटची लोकल रात्री 9.02 वाजता सुटणार आहे.

>> ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

- ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत.
- हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/ओरीजनेट होतील.
- ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यानच धावणार आहे.
- ब्लॉक सुरू होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 9.02 वाजता सुटेल आणि 30.09.2023 रोजी रात्री 10.22 वाजता पनवेलला पोहोचेल.

-  ब्लॉकच्या आधी पनवेलहून अप हार्बर मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी, रात्री 10.35 वाजता पनवेलहून सुटेल आणि रात्री 11.54 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
- ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून रात्री 9.36 वाजता सुटेल आणि 10.28 वाजता पनवेलला पोहोचेल.
- ब्लॉकच्या आधी ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची अप लोकल 9.20 वाजता सुटेल आणि ठाण्याला रात्री 22.12 वाजता पोहोचेल.
- पनवेलसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन दोन ऑक्टोबर रोजी दुपारी 12.08 वाजता सुटेल आणि दुपारी 1.29 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
- ब्लॉकनंतर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेल येथून 1.37 वाजता सुटेल आणि 2.56 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
- ठाणे ते पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन 1.24 वाजता ठाण्याहून सुटेल आणि 2.16 वाजता पनवेलला पोहोचेल.
- ब्लॉकनंतर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेलहून 2.01 वाजता सुटेल आणि ठाण्यात 2.54 वाजता पोहोचेल.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 11 सप्टेंबरपासून रात्रकालीन ब्लॉक सुरू करण्यात आला होता. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.