Type Here to Get Search Results !

Pune : पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना किती वाजता होणार?

पुणे : गणेशोत्सवाला आजपासून  जल्लोषात  (Ganeshotsav 2023) सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज झालं आहे. मानाचे गणपती मंडळंदेखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. कोणत्या मिरवणुका किती वाजता सुरु होणार आहे आणि गणपतींची प्रतिष्ठापना कधी होणार आहे पाहुयात...

Pune Kasaba Ganpati : मानाचा पहिला कसबा गणपती

पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11:37 ला होणार आहे. डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 8 वाजता उत्सव मंडपातून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे.

Tambdi Jogeshwari Ganpati : मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 : 50 ला होणार आहे. श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज आणि सज्जनगड येथील भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून मिरवणुकीला सुरूवात होणार असून केळकर रस्त्यावरील मूर्तीकार गुळुंजकर यांच्याकडून गणेश मूर्ती घेण्यात येईल.

Pune Guruji Talim Ganesh : मानाचा तिसरा गुरुजी तालीम

श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना 1:45 मिनिटांनी होणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक उत्सव मंडपातून ढोल ताशा वाजवत मिरवणूक सुरू होईल.

Tulsibag Ganesh : मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती

तुळशीबागेतील श्रीराम मंदिरा पासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून उद्या सकाळी पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाची मिरवणूक निघणार आहे. दि पूना मर्चंट्स चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि जयराज अँन्ड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते सकाळी 11:30 मिनीटांनी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.

Pune Kesariwada Ganapati : मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती

केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीची प्रतिष्ठापना टिळक पंचांगानुसार 17 ऑगस्ट रोजी झाली आहे. पंचांगनुसार गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

Dagdusheth Halwai Ganpati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना  सकाळी 10: 23 मिनिटांनी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मंदिरापासून आकर्षक फुलांनी सजविलेल्या हनुमान रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Akhil Mandai Ganpati : अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना सकाळी 9 वाजता होणार आहे.ॲड. पराग एरंडे आणि अनुराधा एरंडे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे.अगोदर सकाळी 9 वाजता उत्सव मंडपातून मिरवणूक सुरू होणार आहे.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/mwWp9DK News : नागरिकांनो लाडक्या बाप्पासाठी प्रसादाची खरेदी करताय, मग ही बातमी आधी वाचा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.