Type Here to Get Search Results !

Business : कमी खर्चात व्यवसाय सुरु करा, भरघोस नफा मिळवा; 'या' व्यवसायतून साधा आर्थिक प्रगती

Business News: आजच्या काळात प्रत्येकाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो पण व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप खर्च  येतो. त्यामुळं ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. परंतू, असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी खर्चात सुरू करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. तो व्यवसाय म्हणजे वटाणा विक्रीचा व्यवसाय. या व्यवसायातून तुम्ही कमी खर्चात भरघोस नफा मिळवू शकता. चला तर जाणून घेऊयात वटाणा व्यवसायाबद्दल माहिती.

वटाण्याला वर्षभर मागणी असते. हिरवे वाटाणे हिवाळ्यातच मिळतात. लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये वटाण्यापासून भाज्या आणि इतर गोष्टी बनवल्या जातात. अशा परिस्थितीत वटाण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. जर तुम्हाला हा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करायचा असेल तर तुम्ही तो फक्त एका खोलीतून सुरू करू शकता. मात्र, जर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरु करायचा असेल, तर तुम्हाला 4000 ते 5000 चौरस फूट जागा लागेल.

शेतकऱ्यांकडून वटाणे घेऊन त्यानंतर पँकिंग

व्यवसाय सुरु केल्यास सुरुवातीला वाटाणे सोलण्यासाठी मजूर लागतात. मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु करायचा असेल तर वाटाणा सोलण्याची मशीन लागते. यासोबतच तुम्हाला काही परवानेही घ्यावे लागतील. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला हिवाळ्यात शेतकऱ्यांकडून हिरवे वाटाणे खरेदी करावे लागतील. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. वटाणे खरेदी केल्यानंतर, तुम्हाला सोलणे, धुणे, उकळणे आणि पॅकिंग इत्यादीसाठी मजुरांची आवश्यकता लागणार आहे. गोठलेले वटाणे बनवण्यासाठी, तुम्हाला प्रथम वटाणे सोलून घ्यावे लागतील, त्यानंतर वटाणे सुमारे 90 अंश सेंटीग्रेड तापमानात उकळले जातात. यानंतर ते 3 ते 5 अंश सेंटीग्रेड पर्यंत थंड पाण्यात टाकले जातात. त्यानंतर वटाणे वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात पाठवले जातात.

वटाणा विक्री व्यवसायातून तुम्ही  50 ते 80 टक्के नफा मिळवू शकता

वटाणा विक्रीच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा कमावता येतो. हा व्यवसाय सुरू करून तुम्हाला सुमारे 50 ते 80 टक्के नफा मिळवता येतो. तुम्ही फ्रोझन वटाण्याची पॅकेट थेट किरकोळ विक्रेत्यांना विकल्यास, तुम्ही अधिक नफा मिळवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/XdGJLkl Farmers : 'या' गावातील सर्व महिला करतायेत गायपालन, दूध विकून कमवतायेत लाखोंचा नफा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.