धक्कादायक! बीड मध्ये कोरोना काळात झाले तब्बल 20 हजार बालविवाह...
बीड जिल्ह्यात वारंवार बालविवाह होत असल्याच्या बातम्या समोर येत असतात.त्यातच कोरोना काळात तब्बल 20 हजार पेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत त्यामुळे बीड मधील हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
याबद्दल बोलताना तत्वशील कांबळे म्हणाले की, "की बीड जिल्हा प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून ऊसतोडणीसह इतर कामांसाठी जवळपास दहा ते बारा लाख कामगार लोकं स्थलांतरीत होतात. यामुळं आपल्या किशोर वयात आलेल्या मुलींना आपल्या सोबत कसं घेऊन जायचं ? समाजात दररोज एक ना अनेक घटना घडतात, यामुळे आपल्या मुलींची असुरक्षितता मनात ठेवून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाल विवाह होत आहेत."
तसेच याबद्दल पुढे बोलताना "जर आज शाळेतील मुलींची संख्या पाहिली, तर अतिशय कमी झालेली आहे. पुर्वी एका शाळेत जवळपास 50 मुली असायच्या. मात्र आता जर पाहिलं तर दहा ते पंधरा मुली एका शाळेत आहेत. त्यामुळे या मुली नेमकं गेल्या कुठं असा प्रश्न देखील, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, बालविवाहाचे हे धक्कादायक वास्तव चिंतादायक असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.