Type Here to Get Search Results !

MPSC परीक्षेच्या हॉल तिकिट ची टेलिग्राम  लिंक social मीडिया वर व्हायरल;लिंक वर 90 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट,नेमकं प्रकरण काय?

MPSC परीक्षेच्या हॉल तिकिट ची टेलिग्राम  लिंक social मीडिया वर व्हायरल;लिंक वर 90 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट,नेमकं प्रकरण काय?


MPSC PAPER HALL TICKET


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिलला होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल झालीये... या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.

हा फक्त नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे.



हॉल तिकीट हॅक झाल्याची माहिती कळताच एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नेटकरी संतप्त झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे विद्यार्थी आपला संपात व्यक्त करत आहेत. ते शिंदे-फडणवीस सरकारलाच याबाबत सवाल विचारत आहेत. सरकार काय झोपा काढतंय का?, असा सवाल विद्यार्थी करत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 2023 रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसंच या चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसंच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही.

आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
प्रवेशप्रमाणपत्रे लीक करणाऱ्या चॅनलच्या अडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.



MPSC HALL TICKET LEAK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.