मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा मांडणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे.
पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे या सिनेमात पाहायला मिळतील. शिवाय त्याठिकाणी काय भयाण वास्तवाला त्यांना सामोरे जावे लागले याचे चित्रण 'बलोच'मध्ये असणार आहे. 'बलोच' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे असून सिनेमाचे नवीन पोस्टर झळकले आहे. याशिवाय 'बलोच' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत दिसतील. त्यांच्या आणखी एका ऐतिहासिक भूमिकेसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
आजवर देशांसाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई आपण पडद्यावर पाहिली. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे.
१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत चे तिसरे युद्ध झाले.या एकाच दिवसात दीड लाख सैनिक व ८० हजार जनावरे मारली गेली याची नोंद आहे. असे हे भारताच्या मातीत लढलेले एकमेव भीषण युद्ध...
या युद्धा पर्यंतचा पुर्ण इतिहास आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण युद्धात जिवंत राहिलेले, जखमी झालेले २२ हजार सैनिक आब्दाली ने मीरनासीर खान याला भेट म्हणून दिले.ते सैन्य घेऊन तो बलुचिस्तानला गेला. त्या मराठा सैनिकांच काय झाल, हे तुम्हा आम्हास माहित नाही.त्याच बलुचिस्तान मध्ये जाऊन लढलेल्या वीर मराठा सैन्याची विर यशोगाथा म्हणजे " बलोच " हा चित्रपट होय.या चित्रपटाचा आज ट्रेलर रिलीज झाला आहे.
ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..🎦👇👇⬇️
चित्रपटातील, ऑनिमेशन, कॅमेरा,ऑक्टीग, डायलॉग इ. गोष्टींची उत्तम मांडणी आहे. प्रकाश पवार सरांच दिग्दर्शन ही उत्तम झालेल दिसत आहे.
असा इतिहासात दबलेला, प्रकाश नपडलेला, पराक्रमी मराठ्यांची शौर्य गाथा सांगणारा हा विषय आपण महाराष्ट्रातील जनते समोर आपण घेऊ येताय याबद्दल आपल व आपल्या टीमच खुप खुप अभिनंदन, व चित्रपटा साठी खुप खुप शुभेच्छा....🙏🙏
आपल्या माती साठी लढलेल्या वीरांना अभिवादन म्हणुन हा चित्रपट आपल्या जवळील चित्रपट ग्रहात जाऊन नक्कीच पहा...🚩🚩