आतापर्यंत अनेक लव्हस्टोरींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असलं तरी प्रत्येक लव्हस्टोरीत काही ना काही वेगळेपण पहायला मिळतंच.
यातील ‘जीव तुझा झाला माझा…’, ‘धड धड…’ आणि ‘संगतीनं तुझ्या…’ ही गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली. आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाची झलक दाखवणाऱ्या ‘सर्जा’च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत आहे. रिलीज झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात ‘सर्जा’च्या ट्रेलरवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.
नायक-नायिकेच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. ‘सर्जा’ ही जरी एक रोमँटिक लव्हस्टोरी असली तरी यात समाजातील विविध घटक आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या मुद्द्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केल्याचं पहायला मिळणार आहे. प्रेमाचे विविध पैलू, प्रेमाचे बदलते रंग, प्रेमाच्या नाना छटा आणि कठीण प्रसंगांमध्येही खुलून येणारं खरं प्रेम हे ‘सर्जा’ चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार असल्याचे संकेत देणारा हा ट्रेलर आहे.
यामध्ये अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड, सानिया मुलानी या कलाकारांच्या भूमिका आहेत.
हर्षित अभिराज यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिलं आहे. नयनरम्य लोकेशन्सवरील नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी डिओपी राहुल मोतलिंग यांनी केली आहे. सुबोध नारकर यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन सुनील लोंढे यांनी केलं आहे. प्रशांत प्रल्हाद शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.