D.Ed कोर्स कायमचा बंद होणार ?
नव्या शैक्षणिक धोरणात नवा अभ्यासक्रम...📚
कधी काळी डी.एड. म्हणजे शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा हा सर्वात प्रतिष्ठेचा कोर्स मानला जायचा. आपल्या मुलांनी डी.एड करावं आणि शिक्षक व्हावं असं स्वप्न महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घरोघरी पाहिलं जायचं. याच डी.एड.च्या प्रवेश प्रक्रियांसाठी, किंवा पाल्याच्या शिक्षणासाठी वडिलांनी आपल्या शेतजमिनी गहाण ठेवल्या होत्या , याच डीएडसाठी काही वेळप्रसंगी जमिनीही विकल्या. पण, मुलांचं डीएड पूर्ण केलं. मात्र, आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएड कोर्स कायमचा बंद होणार असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला डीएडचा (D.Ed) अभ्यासक्रम कायमचं बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्याऐवजी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना बीएड (B.Ed) करावे लागणार आहे. विशेष म्हणजे त्यात स्पेशलायझेशनही असणारआहे.शिक्षक होण्यासाठी चार वर्षाचा इंटिग्रेटेड बी एड डिग्री कोर्स असणार आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नव्या धोरणाची अंमलबजावणी होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानुसार, आता बीएडच्या विद्यार्थ्यांना चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांची इंटर्नशिप करणं अनिवार्य असणार आहे. उमेदवाराला ज्या विषयात आवड आहे, त्या विषयात तो इंटर्नशिप करू शकतो. बारावीनंतर नव्यानं बीएडच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्त्यांसाठीच हा नवा पॅटर्न लागू होणार आहे. सध्या बीएडचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर या धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाही.
नव्या धोरणात बीएडबाबत नेमकी तरतूद काय?
• नव्या शैक्षणिक धोरणात डीएडचा अभ्यासक्रम नसणार.
• पोस्ट ग्रॅच्युएट विद्यार्थ्यांना एका वर्षात बीएड करता
येणार आहे.
• पदवी घेतलेल्या उमेदवारांना दोन वर्षात बीएड पूर्म करता येणार आहे बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत.यामध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे याची निवड करता येणार आहे.