Type Here to Get Search Results !

धक्कादायक..? बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट,सांगली बँकेतील अजब प्रकार उघड,नेमकं प्रकरण काय?

 धक्कादायक..? बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट,सांगली बँकेतील अजब प्रकार उघड,नेमकं प्रकरण काय?


बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट,सांगली बँकेतील अजब प्रकार उघड





सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून गहाण ठेवलेल्या सोन्यामध्ये घट आल्याचा प्रकार समोर आला आहे. तासगावच्या कवठेएकंद आणि आटपाडी या ठिकाणी खातेधारकांनी ठेवलेल्या सोन्याच्या वजनात १०० ते १५० मिलीग्रॅम इतक्या वजनाची घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

एक दोन नव्हे तर तब्बल 200 शेतकऱ्यांनी या शाखेत सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या गहाण ठेवल्या आहेत. त्यामुळं प्रत्येकाच्याच बाबतीत असा प्रकार घडला आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सध्या ज्या खातेदाराने बँकेकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरुन चौकशी केली जात आहे. केली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्यात आपोआप कशी काय घट झाली? यामध्ये कुणी गौडबंगाल तर नाही केले ना? बँकेतील कर्मचाऱ्यांकडून चूक तर झाली नाही ना? असे विविध सवाल उपस्थित करत तर्क वितर्क लढविले जात आहे. बँकेतील या प्रकरणाच्या चौकशी कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर व त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कवठेएकंद परिसरातील सोने तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांनी बँकेकडे धाव घेतली. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


कारवाईची मागणी

जिल्हा बँकेच्या शाखेत घडलेल्या या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदरचे सोने गहाण ठेवताना सराफाकडून चुकीचा प्रकार घडला आहे किंवा बँकेतील अधिकाऱ्यांनी यामध्ये गोलमाल केला आहे का? असा प्रश्न देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करून सोने गहाण ठेवणाऱ्या खातेधारकांना भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच याबाबत बँकेकडून जर दुर्लक्ष झाले, तर बँकेच्या दारात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

दरम्यान, मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखांमध्ये यापूर्वी बनावट सोनं ठेवून कर्ज देण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिऱ्यांमध्ये पुन्हा गोलमालचा प्रकार तर घडला नाही ना? असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.