Type Here to Get Search Results !

ट्विटरने एका झटक्यात अनेक दिग्गजांना ब्लू  टिक वरून हटवले;अभिताभ, राहुल गांधी, शाहरुख, सचिन, कोहली, एकनाथ शिंदे, धोनी, अजित पवार..., अजून कोण?

 ट्विटरने एका झटक्यात अनेक दिग्गजांना ब्लू  टिक वरून हटवले;अभिताभ, राहुल गांधी, शाहरुख, सचिन, कोहली, एकनाथ शिंदे, धोनी, अजित पवार..., अजून कोण?


ट्विटरने एका झटक्यात अनेक दिग्गजांना ब्लू  टिक वरून हटवले



मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने राजकारण्यांपासून खेळाडूंपर्यंत आणि सेलिब्रिटीपासून सामान्य यूजर्सपर्यंत सर्वांचेच ब्ल्यू टिक हटवले आहे. आता ब्ल्यू टिक घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

खरंतर, ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी 12 एप्रिललाच घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जातील. आता फक्त अशा लोकांनाच ही सुविधा मिळणार आहे, जे ब्लू टिकसाठी पैसे खर्च करुन मासिक योजना घेतील. यानंतर, 20 एप्रिलच्या रात्री 12 वाजता, अशा सर्व अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले.


दिग्गजांची ब्लू टिक हटवली…

दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक (Blue Tick) काढून टाकली आहे. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाले होते. त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. त्यामुळं येथून पुढे अनेक दिग्गजांच्या अंकाऊटवर ब्लू टिक दिसणार नाहीत. या दिग्गजांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रियंका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, क्रिकेटपटू विराट कोहली, सचिन तेंडूलकर, धोनी आदींची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. आता ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी असेल त्यांना रक्कम भरून ब्ल्यू टिक मिळवावी लागणार आहे.


ट्विटरची याआधी पॉलिसी काय होती?

यापूर्वी, ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकारांसह सेलिब्रिटींच्या अकाऊंटला ब्लू टिक देत असे. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हते, मात्र इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत.



ब्लू टिक पेड सर्विस म्हणजे काय?

यातील बदल म्हणजे ब्लू टिक पेड सर्विस अर्थात सशुल्क सेवा. ज्यांना ब्लू टिक आहे त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सुरुवातीला ही सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता याची भारतातही सुरुवात झाली आहे. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक मिळू शकते.



ब्ल्यू टिक कशी मिळणार?

ब्ल्यू टिक हवा असेल किंवा आताची ब्ल्यू टिक कायम ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सस्क्रिप्शन 650 रुपये एवढे आहे. तर मोबाईल यूजर्ससाठी दरमहिन्याला 900 रुपये मोजावे लागणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.