बीडमधील कधीही न आटणारी खजाना विहीर पहिली आहे का? चला तर बघूया...
दुष्काळी परिस्थितीत अनेक विहिरी कोरड्या पडल्याचे दिसत असताना, बीडमधील या खजाना बावडी विहिरीचे पाणी मात्र गेल्या सव्वाचारशे वर्षांत कधीही आटलेले नाही. विहिरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महापुराच्या परिस्थितीतही ती ओसंडून वाहिलेली नाही.
बीड :बीडचे मूळ नाव चंपावती नगर होते. मुहम्मद बिन तुघलकने देवगिरीवर स्वारी केल्यानंतर हा भाग त्याच्या राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर त्यांनी चंपावती हे नाव बदलून पारशी नाव भिर ठेवले आणि भीरचे अपभ्रंश बीड केले. भीर म्हणजे पाण्याचा प्रदेश. बीड शहराजवळ 1572 च्या सुमारास बांधलेली एक भव्य पाण्याची रचना आहे. खजाना विहार शहराच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर आहे. या विहिरीचा व्यास सुमारे 50 फूट आहे, तर खोली 23.5 मीटर आहे. जमिनीपासून १७ फूट अंतरावर असलेल्या या विहिरीला गोलाकार ओरंडा देखील आहे ज्यावर सहज चालता येते. त्या ओसरीखाली सहा फूट विहीर आहे. या विहिरीतील पाणी नेहमीच किमान चार फूट असते. गेल्या शतकात या विहिरीचे पाणी पावसाळ्यात वाढले नाही, किंवा उन्हाळ्यात आटले नाही.
बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीमध्ये कालवा बांधलेला आहे. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागात पाणी आणण्यात आले असून, या भागातील साडेचारशे एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता विहिरीच्या पाण्यामुळे सिंचनाखाली आहे.
या विहिरीला तीन कालवे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. कधीही न आटणाऱ्या या खजाना विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा वापर केलेला असून, ही विहीर मलिक अंबर यांच्या काळात बांधलेली असावी, असा अंदाज आहे. मध्ययुगीन काळात पैसा किंवा धन जपून ठेवण्यासाठी विहिरींचा उपयोग केला जात असावा. त्यामुळे या विहिरीस खजाना विहिर नाव पडले असावे, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.सध्या पाणीटंचाईची समस्या तीव्र झाल्यामुळे शेकडो फूट खोल विंधन विहिरी आणि विहिरी घेतल्या जातात. मात्र, पाण्याचा असा कायम स्त्रोत क्वचितच सापडतो. अशा परिस्थितीत बीडमधील कधीही न आटणारी खजाना विहिर ही संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय ठरू शकेल.
काय म्हणतात या ठिकाणचे नागरिक : खजाना विहिरीचे बांधकाम 1572 मध्ये झालेली आहे. हे बांधकाम निजाम कालीन आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून स्थापत्य शास्त्रामधील एक कलेचा नमुना आहे, जलस्रोता पैकी एक अतिशय महत्त्वाचा नमुना आहे. यामध्ये पाण्याची लेवल आहे ती येणारे पाणी आणि जाणारे पाणी, अशा प्रकारचा त्याचा मेंटेनन्स केलेला आहे.
ही विहीर १५७२ मध्ये राजा भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सलाबाद खान यांनी बांधलेली आहे, जे जहांगीर होते. त्यांनी जो महसूल गोळा केला होता तो महसूल राजाला न देता या विहिरीचे बांधकाम केले होते. या विहिरीला तीन बोगदे आहेत, एका बोगद्यातून पाणी येते तर, दुसऱ्या बोगदातून बीड शहराला पाणीपुरवठा केला जायचा. या विहिरीचे पाणी आजतागायत कमी झालेले नाही. पाणी पातळीत वाढ किंवा कमी झालेली नाही. पावसाळ्यात थोड्याफार प्रमाणात वाढ होते, मात्र आतापर्यंत ही विहीर कधीही आटलेली नाही. या विहिरीचे पाणी आजही बलगुजर या ठिकाणी शेतीला देण्यासाठी वापरलं जाते. विहीर बीड जिल्ह्यामध्ये नंतर महाराष्ट्रात अत्यंत पुरातन काळातील विहीर म्हणून या विहिरीची ओळख आहे, असे धोंडकर सर्जेराव यांनी म्हटले आहे.
काय आहे या खजाना विहीरीचे महत्व : निजामच्या काळामध्ये बीड या ठिकाणी एक जहागीरदार होता. त्या जहागीरदाराच्या नियंत्रणाखाली हे काम पूर्ण केलेलं आहे. बीड शहराला त्यावेळी पाणी पुरवठा करण्यासाठी या विहिरीची निर्मिती केलेली आहे. राजा भास्कर नावाचा स्थापत्य शास्त्रज्ञ होता. तर सिल्पकार म्हणुन सलाबाद खान यांनी काम पाहिले आहे. या दोघांनी अत्यंत काटकसरीने या विहिरीचे काम पूर्ण केले आहे. परिसरातील जो महसूल गोळा गोळा करून विहिरीसाठी खर्च करण्यात आला, त्या काळात त्याला खजाना म्हणत असत. त्या खजाण्याचा वापर करून या विहिरीचे बांधकाम केले आहे. म्हणून या विहिरीला खजाना विहीर असे नाव पडले असे गोकुळे भानुदास यांनी सांगितले.
विहिरीचे संवर्धन करण्याची गरज : अशी ही वैभवसंपन्न विहीर आज अनेक समस्यांनी ग्रस्त झालेली आहे. विहिरीच्या सिंचन क्षमतेत घट तर होतेच आहे. तथापी, विहिरीच्या लाभधारकांमध्ये सहकारी तत्वावर पाणी वापर, निगराणी बाबत पुरेशी सजगता दिसून येत नाही. या वैभवशाली योजनेतून प्राप्त होणारे लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. ही खरी चिंतेची बाब आहे. करिता या विहिरीचे संरक्षण, संवर्धन त्वरेने होण्याची आज तातडीची गरज आहे.