Type Here to Get Search Results !

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? पाहा...

देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतंय तुम्हाला माहितीये का? या स्टेशनवर दिवसरात्री चोवीस तार गर्दी राहते. या स्टेशनवर दररोज 600 ट्रेन धावतात. तर येथून दररोज साधारण जवळपास 10 लाख लोक आपला प्रवास सुरु करतात. आज आपण या अनोख्या आणि मोठ्या रेल्वे स्टेशनविषयी जाणून घेणार आहोत.



सर्वात मोठं रेल्वे जंक्शन....

देशातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनच नाव हावडा आहे. हे देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहेच, यासोबतच हे सर्वात व्यस्त असणारं रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत. तर 26 रेल्वे लाइन आहेत. ज्यावरुन रोज जवळपास 600 ट्रेन पास होतात.

हावडा जंक्शनला देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या यादीत जागा मिळाली आहे. कोलकातामधील हे रेल्वे स्टेशन टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 च्या नावाने देखील ओळखलं जातं. हावडाला देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या यादीत जागा मिळालीये. कोलकातामध्ये हावडासह सियालदह नावाचं अजून एक मोठं रेल्वे स्टेशन देखील आहे. यासोबतच संतरागाछी, शालीमार आणि कोलकाता रेल्वे स्टेशनही आहे.

कधी बांधलं गेलं हे स्टेशन?

हावडा रेल्वे जंक्शन पूर्व विभागांतर्गत येते. या जंक्शनवरून दररोज 350 हून अधिक गाड्या त्यांच्या प्रवासासाठी जातात. तर एवढ्याच गाड्या येथे थांबतात देखील. देशातील सर्वात जुने रेल्वे स्थानक होण्याचा मानही या जंक्शनला मिळाला आहे. या रेल्वे स्थानकाची इमारत 1854 साली बांधण्यात आली. हे स्टेशन हुगळी नदीवर बांधलेल्या पुलाद्वारे कोलकाता मुख्य शहराला जोडते. येथून देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागासाठी गाड्या पकडल्या जाऊ शकतात. या जंक्शनमध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त गाड्या ठेवण्याची क्षमता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.