Type Here to Get Search Results !

पाकमध्ये मुलींच्या कबरीला कुलुप; मृतदेहांवर होत आहेत बलात्कार

पाकमध्ये मुलींच्या कबरीला कुलुप; मृतदेहांवर होत आहेत बलात्कार...

पाकमध्ये मुलींच्या कबरीला कुलपे; मृतदेहांवर होत आहेत बलात्कार


स्लामाबादवृत्तसंस्था : पाकिस्तानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक आई-वडील आपल्या मृत मुलींच्या कबरींना कुलपे ठोकत आहेत. मुलींच्या मृतदेहांवर विकृतांनी बलात्कार करू नये म्हणून ही तजवीज केली जात आहे.

'डेली टाईम्स'मध्ये याबाबतचे विस्तृत वृत्त छापून आले आहे. मृतांसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याच्या कृत्याला नेक्रोफिलिया असे संबोधले जाते. नेक्रोफिलियाचे अनेक प्रकार या देशात उघडकीला आले आहेत.

पाकिस्तानात एरव्ही दर दोन तासांनी एका महिलेवर बलात्कार होतो. मृत महिलांवरील बलात्काराचे प्रकार मात्र या देशाची मान शरमेने खाली घालणारे आहेत. पाकमधील विचारवंत हारिस सुल्तान यांनी या प्रकारांना कट्टरवादी मत प्रवाह जबाबदार असल्याचे म्हटलेले आहे.

नेक्रोफिलियाच्या गुन्ह्याचा भयावह प्रकार पाकमध्ये पहिल्यांदा 2011 मध्ये उघडकीला आला होता. कब्रस्तानाची देखरेख करणार्‍या कराचीतील नॉर्थ निझामाबाद येथील मोहम्मद रिझवान याने त्याच्या नोकरीदरम्यान जवळपास प्रत्येक स्त्री मृतदेहाची कबर उकरून बलात्कार केला होता.

मोहम्मद रिझवान याने स्वत:च 48 महिलांच्या मृतदेहांसोबत बलात्कार केल्याची जाहीर कबुली दिली होती. पाकिस्तानात 40 टक्क्यांवर महिला आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी हिंसेला बळी पडतातच पडतात, असे मानवाधिकार आयोगाचे म्हणणे आहे. मृत्यू सर्व दु:खांतून सुटका करतो म्हणतात; पण पाकिस्तानातील महिलांची मृत्यूनंतरही सुटका नसल्याची स्थिती आहे. मृत मुली तसेच महिलांच्या कबरींवर लोखंडाचे गेट तसेच कुलपे ठोकली जात असली, तरी हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याची परिस्थिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.