Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचा एसटी बस ने प्रवास करत महिलांना सवलतीचा लाभ घेण्यास केले आवाहन



जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांचा एसटी बस द्वारे प्रवास...

महिलांनी सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50% च्या सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा असे केले आवाहन

बीड: 'महाराष्ट्र शासनाने ज्यांचे वय 75 पेक्षा जास्त आहे अशा सर्व नागरिकांना एसटी बसेस मध्ये मोफत प्रवास सवलत शासनाने दिलेली आहे. तसेच महिलांना सर्व प्रकारचे एस टी बसेस (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस सेवा) मध्ये 50% च्या सवलतीच्या दरामध्ये सूट दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या उपयोग घ्यावा .


आता उन्हाळ्याच्या सुट्टी आहे मुलांच्या सुट्टी आहे कुठेतरी बाहेर जायचे असते, मुलांना पण इच्छा असते, की बाहेर जावं शासनाचे ही सवलत दिली आहे त्याचा सर्व महिलांनी उपयोग व लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले .


ग्रामीण महिलांच्या सोयीच्या दृष्टीने एसटी बसेस ची व्यवस्था सुधारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे सांगून त्या म्हणाल्या, आज खूप वर्षानंतर मी बसमधून प्रवास करते आहे. आता प्रशासकीय सेवेत असल्याने व कामाचा व्याप असल्याने बसचा प्रवास कमी झाला आहे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.


एसटी बस सेवेला ऊर्जा देण्यासाठी अनौपचारिक सहलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रयत्न केला आहे .यासाठी आज बीड बस स्थानक येथून चार वाजता एसटी बस द्वारे प्रवास करून नायगाव येथे जाण्यासाठी त्यांचे प्रयाण झाले. यावेळी त्यांचा समवेत आई व त्यांच्या दोन्ही मुली तसेच विविध शासकीय महिला अधिकारी ,एसटी महामंडळातील महिला अधिकारी -कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पत्नी, बीड तहसीलदार यांच्या पत्नी होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.