Type Here to Get Search Results !

उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण, अशी घ्याल काळजी ?

 


उन्हाळा सुरू झाला की आरोग्याच्या तक्रारी वाढतात.पण योग्य ती काळजी घेतल्यास आपण तंदुरुस्त राहू शकतो. सध्या ऊन इतका पडत आहे की दुपारी घराबाहेर पडणं देखील अवघड होत आहे.

चला तर मग आपण जाणून घेऊया उन्हाळ्यात आपण आपली काळजी कश्या प्रकारे घेऊ शकतो...

उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल..? जाणून घ्या...


फ्रिजमधील पाणी न पिता घरात माठ असेल तर त्यातील पाणी सेवन करावे. तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नये.

• कोकम सरबताचे सेवन करावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच पिऊ शकता.

• कडक उन्हाळयात बाहेर जाताना आवर्जून डोके झाकणे. त्यासोबतच गॉगल देखील लावा याने डोळ्यांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होईल.

• घाम शोषुन घेतील असे कपडे वापरणे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे.

• घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.

• डाळिंबाचे सरबत हे पित्तशामक असते. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे सेवन करावे.नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय  फायदेशीर ठरु शकते.

• दुपारी 12  ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

• शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

• घरावरील छतावर पक्षांसाठी पाणी ठेवा.

• पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

• उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.तसेच ओल्या कपड्यांनी डोके,मान व चेहरा झाकण्यात यावा.


काय करू नये ?

• उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.

• दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

• दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

• उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.

• लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

• गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

• बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

• उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.