Type Here to Get Search Results !

का साजरा होतो जागतिक आरोग्य दिन...? जाणून घ्या..

 


जागतिक आरोग्य दिन:- संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन (World Health Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जगात निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयी समस्या लक्षात घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना करण्यात आली. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली   जाते.आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या सात दशकांपासून सातत्याने जगातील गंभीर आजार आणि आरोग्य संकटांचा सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. 


जागतिक आरोग्य दिन का महत्त्वाचा आहे?

• या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी नवीन आणि वेगळी थीम निवडल्याने लोकांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची खात्री होते.


• जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही सध्याच्या महत्त्वाच्या आरोग्य समस्यांवर आधारित दरवर्षी थीम म्हणून नवीन विषय निवडते.

• हे लोकांना एकत्र आणते.

• दिवस व्यक्तीच्या आरोग्यावर प्रतिबिंबित करतो.

जागतिक आरोग्य दिन 2023 थीम (World Health Day Theme 2023) :


जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेने 1991 पासून एका थीमनुसार तो साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कोणत्या ना कोणत्या थीमनुसार साजरा केला जातो. यावर्षी साजरा होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनासाठी सर्वांसाठी आरोग्य (World Health Day 2023 Theme- Health For All) ही थीम ठेवण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.