Type Here to Get Search Results !

SAMSUNG S24 ची दमदार series लवकरच होणार लाँच....

 भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपली नवीन Galaxy S24 series लाँच करण्याच्या तयारीत आहे.सॅमसंग आपल्या येणाऱ्या आगामी flagship series मध्ये खूप मोठे बदल करणार आहे.Samsung GALAXY S24 SERIES च्या प्रोसेसर च्या डिटेल लिक झाल्या आहेत.

SAMSUNG S24 ची दमदार series लवकरच होणार लाँच....


सॅमसंग ने आपली मागील series म्हणजेच SAMSUNG GALAXY S23 SERIES भारत ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला होता.ही सीरीज लॉन्च होऊन काही दिवस झाले आहेत की सॅमसंगच्या आगामी Galaxy S24 सीरीजबद्दल माहिती समोर आली आहे. सॅमसंगची ही स्मार्टफोन सीरीज पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला येईल. या सीरिजच्या प्रोसेसरबाबत एक नवीन लीक समोर आली आहे. या वर्षी लॉन्च झालेल्या सीरिजप्रमाणेच, पुढील सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन Galaxy S24, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra येतील.

आता Galaxy S23 ही सिरीज लॉन्च होऊन जवळपास दोन महिने उलटले असून त्याच्या पुढील सिरीजची माहिती लीक झाली आहे. Galaxy S23 सिरीजनंतर आता कंपनीच्या आगामी Galaxy S24 सिरीजचे तपशील लीक झाले आहेत, ज्यात आता रॅम आणि प्रोसेसर बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Samsung Galaxy S24 Ultra लीक

सॅमलोव्हरचे म्हणणे आहे की Samsung Galaxy S24 Ultra 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह लॉन्च केला जाईल. फोनमध्ये QHD+ स्क्रीनसह सुपर AMOLED पॅनेल असण्याची अपेक्षा आहे. आम्ही नमूद केल्याप्रमाणे, Galaxy S24 Ultra हा 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असणारा Galaxy S मालिकेतील पहिला फोन असेल.Android 14 OS आधारित OneUI 6 Galaxy S24 मालिकेत उपलब्ध असेल. फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये आगामी स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाईल.

अहवालात असे म्हटले आहे की Galaxy S24 Ultra मध्ये 200-मेगापिक्सलचा प्राथमिक मागील सेन्सर असेल. मागील मालिकेच्या तुलनेत कॅमेरा फीचर्स अपग्रेड केले जातील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की Galaxy S23 Ultra मध्ये 200-megapixel HP2 सेन्सर देण्यात आला आहे आणि त्याला चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. जर हा अहवाल खरा असेल तर याचा अर्थ असा आहे की सर्व S24 सीरीज स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली सेन्सर दिले जातील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.