Type Here to Get Search Results !

WhatsApp Companion Mode: एकाच वेळी चार मोबाइलवर व्हाट्सअँप वापरणे शक्य,कसे ते जाणून घेऊया...

 WhatsApp Companion Mode:

एकाच वेळी चार मोबाइलवर व्हाट्सअँप वापरणे शक्य,कसे ते जाणून घेऊया...

One whatsapp multiples device एकाच वेळी चार मोबाइलवर व्हाट्सअँप


आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेलं व्हाट्सअँप हे सध्या एक महत्वाचं मेसेंजिंग अँप ठरलं आहे. यामुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीला संपर्क करणं सहज सोप आहे. त्याचसोबत कामाच्या ठिकाणी देखील या अँपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

व्हाट्सअँप हे एकावेळी एकाच फोनमध्ये वापरता येत होतं. फार तर एक फोन आणि लॅपटॉप असं वापरता येत होतं. मात्र एकाच नंबरवरील व्हाट्सअँप अकाउंट एकापेक्षा जास्त फोनमध्ये वापरण्याची परवानगी दिली जात नव्हती. परंतु आता तुम्ही एकपेक्षा जास्त फोनमध्ये एकाच नंबरने अकाउंट वापरू शकणार आहात.

व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट कंपॅनियन मोड फीचरमुळे युजर्सना एकाच वेळी चार डिव्हाइसना कनेक्ट करण्याची सुविधा मिळेल.या फिचरमुळे युजर्सना वेगवेगळ्या डिव्हाइसवरून व्हाटस्अप ऍक्सेस करता येणार आहे. सध्या हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला व्हाॅट्सअॅपचं बीटा वर्जन डाउनलोड करावं लागेल.मात्र हे फिचर डाउनलोड केल्यानंतर ते वापरण्यासाठी २४ तास थांबावं लागेल. सध्या iOS वापरकर्ते व्हॉट्सॲपचे नवीन फीचर वापरू शकत नाहीत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार युजर त्यांचे WhatsApp खाते चार किंवा अतिरिक्त स्मार्टफोन्सशी लिंक करू शकतील आणि त्यांना दुय्यम डिव्हाइस अधिकृत करण्यासाठी फक्त प्राथमिक फोन वापरावा लागेल. ही प्रक्रिया WhatsApp वेब अधिकृत करण्यासारखीच आहे.  युजर्सना QR कोड स्कॅन करणं आवश्यक आहे, पर्याय म्हणून OTP किंवा व्हेरिफिकेशन कोडची देखील सुविधा उपलब्ध असणार आहे.

कँपॅनियन मोडद्वारे चार डिव्हाइसवर असे करा व्हॉट्सॲप युज

तुमचा दुसरा Android मोबाइल डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून WhatsApp Messenger fahar WhatsApp

• Business चे लेटेस्च बीटी व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.

• यानंतर कलेक्ट A डिव्हाइस या ऑप्शनवर क्लिक करा आणि डिव्हाइस कनेक्ट करावा.

• व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मेन डिव्हाइसच्या सेटिंगमध्ये जाऊन कनेक्टेड डिव्हाइस हा ऑप्शन सिलेक्ट करावा.

• त्यानंतर, तुमच्या बॅकअप स्मार्टफोनवरील QR कोड स्कॅन करण्यासाठी दुसरा डिव्हाइस वापरा.

   चारही डिव्हाइसमध्ये हिस्ट्री होईल सिंक

या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही एका वेळी चार डिव्हाइसवर WhatsApp वापरण्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या डेटाच्या इतिहासाची काळजी करण्याची गरज नाही. हे फीचर तुमची व्हॉट्सॲप हिस्ट्री चारही डिव्हाइसवर सिंक करेल.


एका वृत्तानुसार या वर्षी व्हाॅट्सअँप मेसेज एटिट करण्याचं नवं फिचर लॉन्च करण्याची शक्यता आहे. यामुळे एखादा सेंड करण्यात आलेला मेसेज एडिट करणं शक्य होईल. सध्या मेसेजमध्ये एखादी चूक झाल्यास तो डिलीट करून पुन्हा पाठवावा लागतो. यासोबतच एखाद्या चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये एखादा मेसेज पीन करण्याचं फिचर येण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रुप चॅटमधील एखादा महत्वाचा मेसेज वर ठेवण्यास मदत होईल. एकंदरच येत्या काळात व्हाॅट्सअँपवर अनेक नवे फिचर येण्याची शक्यता आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.