Type Here to Get Search Results !

संपत्तीवर मुलगी-सुनेला मिळतो हा अधिकार;नियम काय सांगतात? जाणून घ्या...

 संपत्तीवर मुलगी-सुनेला मिळतो हा अधिकार;नियम काय सांगतात? जाणून घ्या...


संपत्तीवर मुलगी-सुनेला मिळतो हा अधिकार


स्त्रियांना प्रत्येक गोष्टींवर पुरुषांसारखा समान अधिकार असतो. स्त्री जरी तिच्या आयुष्यात कधी मुलगी, कधी पत्नी, कधी सुन अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत घर सांभाळत असली तरी आजची स्त्री घर सांभाळूनही आपल्या पायावर उभी आहे.

संविधानाने स्त्री पुरुष समान हक्क प्रदान केले आहे. एवढंच काय तर संपत्तीमध्ये सुद्धा स्त्रिला समान हक्क आहे.

संपत्तीवर कोण दावा करू शकतो? कोणा कोणाला याचा हक्क मिळतो? याचे नेमके नियम काय आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं.कायदा काय म्हणतो याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत...


मुलगी आणि सुनेचा वडिल आणि सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर किती हक्क असतो, तुम्हाला माहिती आहे का?

हिन्दू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, २००५ नुसार मुलींना संपत्तीचा समान अधिकार देण्यात आलाय तर सुनेला बहू प्रॉपर्टीमध्ये आपल्या नवऱ्याच्या शेअरद्वारा प्रॉपर्टीवर हक्क मिळतो. मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार दिले आहेत तर सुनेला मात्र ठराविक अधिकार आहे.

सुनेचा सासु-सासऱ्यांच्या संपत्तीवर अधिकार

सासु-सासऱ्यांच्या संपत्तीवरही सामान्य परिस्थितीत महिलांचा कोणताही अधिकार नसतो. मग ते जिवंत असो किंवा नसो. महिला त्यांच्या संपत्तीव कोणताही दावा करु शकत नाही. सासु-सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्ती अधिकार महिलेला नाही तर तिच्या पतीला मिळतो. मात्र सासु-सासऱ्यांच्या पहिलेच पतीचा मृत्यू झाला. तर अशा परिस्थितीत महिलेला संपत्तीमध्ये अधिकार मिळतो. मात्र यामध्ये सासु-सासऱ्यांनी त्यांची संपत्ती इतर कोणाच्या नावावर केलेली नसावी. एवढंच नाही तर आई-वडिलांच्या परवानगीशिवाय मुलगा देखील त्यांच्या घरात राहू शकत नाही. ज्यावेळी वडिलांनी स्वतःच्या पैशांनी संपत्ती खरेदी केलेली असेल. तेव्हा मुलगा कायद्याचा वापर करुनही त्यांच्या घरात राहू शकत नाही.


मुलाच्या मृत्यूनंतर सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर सुनेचा अधिकार

नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुनेला समान अधिकार मिळतो. नवऱ्याच्या निधनानंतर सासू सासरे सुनेला घर किंवा संपत्तीपासून दूर करू शकत नाही.

मुलींचा वडिलांच्या संपत्तीत हक्क

प्रत्येक कुटूंबात मुलीचा आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर समान हक्क असतो. मुलगी विवाहित असो की विधवा किंवा घटस्फोटीत तरीसुद्धा ती आई वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क मागू शकते. एवढंच काय तर प्रॉपर्टीमधील संपत्तीवर मुलीचा पुर्ण अधिकारही असू असतो.

जर वडिलांनी वारसपत्रात मुलीचं नाव लिहिले नसेल तर तिला संपत्तीचा अधिकार मिळत नाही पण वडिलांचा वारसपत्र न लिहताच मृत्यू झाला असेल तर तिला तिच्या भावंडासारखा संपत्तीत समान अधिकार मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.