धक्कादायक!बीड जिल्ह्यात पाच दिवसाला एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता
राज्यातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असल्याची आकडेवारी समोर येताच,बीड मधील देखील मुली गायब गायब होत असल्याचे प्रकार समोर आला आहे.बीड मधून पाच दिवसाला एक अल्पवयीन मुलगी गायब होत असल्याचे समोर आले आहे.यात अल्पवयीन मुलींसह विवाहित तरुणी व आईंचा समावेश आहे.
Beed news: बीड जिल्ह्यात मागील दोन महिन्यात 18 वर्षावरील 30 पेक्षा अधिक महिला,मुली बेपत्ता झाल्या आहेत.त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे
त्यामुळे 'सोळावं वरीस धोक्याचं,' हे यानिमित्ताने आता खरे ठरू लागले आहे. तर गायब झालेल्या मुलींमध्ये 14 ते 18 वर्षातील मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. अगदी दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगीही प्रेमात पडून प्रियकरासोबत धूम ठोकत आहे.
त्यामुळे बेपत्ता मुलींच्या वाढत्या संख्येमुळे पालक चिंतेत आहेत.18 वर्षांच्या आतील मुलाला/मुलीला पळवून नेले किंवा बेपत्ता झाले तर ते कायद्याच्या कलम 363 नुसार अपहरण मानले जाते. मात्र, ही प्रकरणे प्रत्यक्षात अपहरणाची आहेत का, हा प्रश्न कायम आहे.
पालकांनी देखील काळजी घेण्याची
या घटनेला पालकही तेवढेच जबाबदार आहेत.पालकांनी देखील आपल्याला मुलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.त्यांना विश्वासात घेतले जात नाही.कामाच्या नादात त्यांच्या कडे दुर्लक्ष दिले जाते.याचाच फायदा प्रियकर मुले घेत असताना दिसून येत आहे.मुलींना नको ते आमिष दाखवून दोघेही पळून जातात सैराट होतात.त्यामुळे पालकांनी त्यांच्या सोबत सोबत कामातून वेळ कडून त्यांच्या सोबत सोबत निवांत वेळ घालावा त्यांना प्रेम द्यावे समजावे.
राज्यात सरासरी रोज 70 मुली बेपत्ता..
राज्यात गेल्या तीन महिन्यात 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे.जानेवारी महिन्यात 1600 आणि फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झाल्या आहेत अशी आकडेवारी आहे.तर धक्कादायक म्हणजे एकट्या मार्च महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या अशी नोंद आहे.राज्यात सरासरी 70 मुली रोज बेपत्ता होत आहेत.त्यात सर्वाधिक 18 ते 20 वयोगटातील मुलींचा समावेश आहे.