Type Here to Get Search Results !

"ONDC अँपद्वारे Zomato आणि Swiggy ला सरकारचा 'फटका', खाद्यपदार्थांची दरे 30% ते 80% स्वस्त!"

 "ONDC अँपद्वारे Zomato आणि Swiggy ला सरकारचा 'फटका', खाद्यपदार्थांची दरे 30% ते 80% स्वस्त!"

"ONDC अँपद्वारे Zomato आणि Swiggy ला सरकारचा 'फटका', खाद्यपदार्थांची दरे 30% ते 80% स्वस्त!"


ONDC Food Delivery App: ONDC फूड डिलिव्हरी अँप हे रेस्टॉरंट्सना ग्राहकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी स्वस्त आणि अधिक सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने तयार केलेले एक अँप आहे.  इतर फूड डिलिव्हरीअँपद्वारे आकारले जाणारे कमिशन कमी करणे आणि रेस्टॉरंट आणि ग्राहक यांच्यात थेट कनेक्शन प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.  हे अँप व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर आहे.

ONDC अँप सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध आहे.आता ह्या अँप ची लोकप्रियता ही वाढतच चालली आहे त्याला कारणही तसेच आहे.हे अँप फूड डिलिव्हरी वर भरघोस डिस्काउंट देत आहे.तसेच दररोज 10000 पेक्षा जास्त फूड डिलिव्हरी करत असल्याचे समोर आले आहे.लोक इतर फूड डिलिव्हरी अँप सोबत तुलना करून किंमतीत फरक असल्याचे दिसत आहे.ONDC या अँपवरुन कमी किंमतीत फूड डिलिव्हरी होत आहे.त्यामुळे खवय्ये ONDC ला जास्त प्राधान्य देत आहेत असे दिसून येत आहे.

परंतु ही सुविधा देशाच्या प्रत्येक शहरात उपलब्ध
नाही.तसेच मोजक्याच रेस्टॉरंटमध्ये ही सुविधा मिळत आहे.ONDC अँप तुमच्या शहरात आहे का? तर सविस्तर पहा...

ONDC कुठे उपलब्ध आहे?

ONDC अँप सर्वात आधी सप्टेंबर 2022 मध्ये बेंगलोर येथे सुरू करण्यात आले होते.त्यामुळे बेंगलोर मध्येच ही सुविधा सध्या तरी उपलब्ध आहे.या अँप ची लोकप्रियता पाहता लवकरात लवकर हे अँप इतर शहरात चालू होईल असे सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.