Type Here to Get Search Results !

Sharad Pawar Gautam Adani: शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात अर्धा तास चर्चा; कोणत्या मुद्यांवर झाला खल?

Sharad Pawar meets Adani:  अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर (Silver Oak) दाखल झाले होते. जवळपास अर्धा तास पवार आणि अदानी यांच्यात चर्चा झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत आणखी एक शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी अदानी यांच्यासह एक शिष्टमंडळ आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर पवार यांनी वर्षा बंगल्यावरून निघताना माध्यमांशी संवाद करणे टाळले होते. त्यानंतर पवार हे तातडीने सिल्वर ओकवर दाखल झाले. त्यानंतर काही मिनिटांमध्येच गौतम अदानी हे सिल्वर ओकवर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

पवार आणि अदानींमध्ये चांगले संबंध आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्याकडे सिंगापूरमधील एक शिष्टमंडळ आले होते. काही तांत्रिक मुद्यांवर त्यांना उद्योजक गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. गौतम अदानी आणि  सिंगापूरच्या शिष्टमंडळ यांची भेट झाली. या तांत्रिक मुद्यांबाबत पवार अनभिज्ञ होते. त्यामुळे अदानी आणि सिंगापूरच्या शिष्टमंडळाच्या भेटीच्या वेळी पवार हे फक्त उपस्थित होते. त्यांनी चर्चेत सहभाग घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत. पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझ्या सांगाती'मध्ये अदानी यांच्या उद्योगशीलतेचे कौतुक करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशीची मागणी करण्यात येत होती. मात्र, त्याच वेळी पवार यांनी अदानी यांच्याबाबत मवाळ भूमिका घेत जेपीसीकडून काही साध्य होणार नसल्याचे म्हटले होते. काँग्रेस आणि इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पवार यांनी आपल्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला.

एप्रिल महिन्यात झाली होती पवार-अदानी भेट

20 एप्रिल रोजी गौतम अदानी (Gautam Adani) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा केली. जवळपास दोन तास चर्चा झाली.  चर्चेचा विषय नेमका काय होता, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

याआधीदेखील महाविकास आघाडीचे सरकार असताना गौतम अदानी यांनी बारामतीला भेट दिली होती. या भेटीत बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिले होते. अदानी यांच्या या भेटीनंतर काही दिवसात महाविकास आघाडीचे कोसळले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.