Type Here to Get Search Results !

शार्दूल की अश्विन, ईशान की भरत ? कुणाला मिळणार संधी? WTC फायनलसाठी कशी असेल टीम इंडिया

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधली जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. याअगोदर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून भारत इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी भारताचे 11 शिलेदार कोण ? याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. 9 जागावरील खेळाडू ठरले आहेत. पण दोन जागांसाठी चूरस अद्याप सुरु आहे. विकेटकिपर म्हणून कुणाला पसंती मिळणार.. ईशान किशन की केएस भरत.. यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार... याकडे नजरा लागल्या आहेत. डाव्या हाताने फलंदाजी कऱणाऱ्या ईशान किशन याचे पारडे जड मानले जातेय. पण भरत याच्याकडे तगडा अनुभव आहे. त्यामुळे कुणाला संधी मिळते.. याकडे लक्ष लागलेय.

भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजासह उतरणार की तीन याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  इंग्लंडमधील खेळपट्टी वेगवान माऱ्याला मदत करतात.. त्यामुळे शार्दूल ठाकूर याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या संघा लेफ्टी फलंदाज जास्त आहेत..त्यामुळे अश्विनची वर्णी लागू शकते. अश्विन आणि शार्दूल यांच्यापैकी एका गोलंदाजासा संघात स्थान मिळू शकते. दोन्ही खेळाडू तळाला फलंदाजी करण्यास तरबेज आहेत.

उमेश की उनादकट... यामध्येही पेच आहे..

उमेश यादव याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. उमेश यादव सुरुवातीला भेदक मारा करु शकतो. त्याशिवाय मोठे स्पेल टाकण्यातही तरबेज आहे. डावखुरा असल्याने जयदेवला संधी देणार का ? असाही प्रश्न उपस्तित झालाय. उमेश यादव याचे पारडे जड मानले जातेय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपसाठी टीम इंडियाचे 11 शिलेदार कोणते असू शकतात.. पाहा संभावित यादी

रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल
चेतेश्वर पुजारा
विराट कोहली
अजिंक्य रहाणे
रविंद्र जाडेजा
ईशान किशन/केएस भरत
आर अश्विन/शार्दूल ठाकूर
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
उमेश यादव

WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.