Type Here to Get Search Results !

विराट कोहलीचे शतक, अश्विन-जाडेजाची अर्धशतके, 438 धावापर्यंत भारताची मजल

IND vs WI 2nd Test Match : दुसऱ्या कोसटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 438 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आपल्या ५०० वे आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकाला गवसणी घातली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हा १०० वा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल, अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांनी अर्धशतके ठोकली.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी संयमी फलंदाजी केली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर दोघांनीही धावा काढण्यास सुरुवात केली. विराट कोहलीने पहिल्यांदा शतक झळकावले, त्यानंतर रविंद्र जाडेजाने अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर लागोपाठ भारताच्या विकेट पडल्या. विराट कोहलीने १२१ धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजाने ६१ धावांचे योगदान दिले.

विराट कोहलीने २०६ चेंडूत १२१ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार लगावले. तर रविंद्र जाडेजा याने १५२ चेंडूत पाच चौकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी केली. रविंद्र जाडेजा आणि गिल झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी डावाला आकार दिला.

INDIA 438 ALL-OUT.

The star of the show has been King Kohli with 121 runs and fifties from Jaiswal, Rohit, Jadeja & Ashwin. pic.twitter.com/s2jujJxK4t
— Johns. (@CricCrazyJohns) July 21, 2023

रविंद्र जाडेजा आणि विराट कोहली एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यानंतर इशान किशन आणि आर. अश्विन यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण इशान किशन २५ धावा काढून बाद झाला. इशान किशन याने चार चौकाराच्या मदतीने ३७ चेंडूत २५ धावांची खेळी केली.

इशान किशन बाद झाल्यानंतर उनाडकटही फार काळ टिकला नाही. उनाडकट सात धावा काढून तंबूत परतला. मोहम्मद सिरजला खातेही उघडता आले नाही. अश्विन याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत भारताची धावसंख्या वाढवली. अश्विन याने अखेरीस फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. अश्विन याने ७८ चेंडूत आठ चौकाराच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली.

Ravichandran Ashwin with bat against West Indies:

0, 4*, 103, 14, 124, 30, 113, 3, 118, 1, 7, 35, 56.

Remarkable record!!!! pic.twitter.com/PwvoIAeUi5
— Johns. (@CricCrazyJohns) July 21, 2023

वेस्ट इंडिजकडून केमर रोज आणि जोमल वॉरिकन यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर जेसन होल्डर याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.