Ajwain For Stomach : सध्याच्या काळात बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या भेडसावत आहे. पोटात गॅस असेल तर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पोटातील गॅस अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतो. तसेच अ‍ॅसिडिटीच्या समस्येमुळे देखील अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी काय करावे जाणून घेऊयात.

ओवा हा एकमेव पदार्थ आहे जो तुम्हाला पोटाच्या आजारांपासून दूर ठेऊ शकतो. ओव्याला त्याच्या आयुर्वेदीक कारणांमुळे बहुगुणी देखील म्हणले जाते. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओवा घेतल्यास गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होऊ शकते. ओवा तुम्ही भाजीत घालून खाऊ शकता किंवा तो गरम पाण्यासोबत घेतल्यास त्याचा परिणाम अधिक जाणवतो.

काय आहेत ओव्याचे फायदे -

- पोटदुखीपासून तुम्हाला आराम हवा असल्यास तुम्ही रोज सकाळी ओवा चावून खाणे गरजेचे आहे. सकाळी ओवा चावून खाल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

- तर तुम्ही सकाळच्या चहामध्ये चहापत्ती सोबत ओवा देखील घाल शकता. तसेच एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घाला आणि पाणी चांगले उकळू द्या. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. यामुळे पोटदुखी आणि गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळू शकतो.

- ओवा हे एक अप्रतिम आयुर्वेदिक औषध आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे अपचन दूर करण्यासोबतच लठ्ठपणाही दूर करण्यास मदत होते.

- एका भांड्यात एक ग्लास पाणी उकळून त्यात एक चमचा ओवा आणि आल्याचा तुकडा घालून चांगले उकळा. त्यानंतर ते गाळून प्या. हे पेय रोज पिल्यास पोटाचे अनेक आजार दूर होऊ शकतात.

- आजकाल खराब जीवनशैलीमुळे गॅस-अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ, गॅस, पोटदुखी अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोमट पाण्यासोबत ओव्याचे सेवन केल्यास या समस्या दूर होतात. तसेच रोज केल्या जाणाऱ्या भाज्या किंवा कोशिंबीर यात देखील ओव्याचा वापर केल्यास शरीरास अनेक फायदे होऊ शकतात.

- पोटदुखीचा त्रास होत असल्यास सकाळ संध्याकाळ ओवा आणि हिंग मिसळून ते चाटण घ्या. यासाठी चिमूटभर ओवा आणि हिंग घ्या ते मिसळा हे चाटण घेऊन त्यावर लगेच पाणी प्या.

- सांधेदुखीची समस्येवरील मोठा पर्याय म्हणजे ओवा. ओव्यामध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म हाडे मजबूत करतात आणि वेदना दूर करतात.

इतर महत्वाच्या बातम्या

<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/FNlVSyC Tips : 'या' चांगल्या सवयींचा तुमच्या दैनंदिन जीवनात करा समावेश! कुठलाच आजार तुमच्या जवळ नाही येणार

Health Tips : पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास ओवा फायदेशीर; जाणून घ्या काय आहेत फायदे
सप्टेंबर ०९, २०२३
0
Tags