मुंबई : रात्री उशिरापर्यंत जागे राहणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक आजारांची समस्या उद्भवू शकते. व्यायाम आणि आहारासोबतच पुरेशी झोप उत्तम आरोग्यसाठी आवश्यक आहे. दररोज किमान 7 ते 8 तास झोप (Sleeping Habits) आवश्यक आहे. रात्री लवकर झोपणंही आवश्यक आहे. मात्र, काही लोकांना रात्री लवकर अंथरुणावर पडून सुद्धा झोप लागत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर फिरण्यामध्येच जास्त वेळ निघून जातो. तुमच्यासोबतही असं होत असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. काही सोपे उपाय केल्याने तुम्हांला चांगली झोप लागेल. हे उपाय कोणते जाणून घ्या. (How to Get Good Sleep)

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांचं अनेक वेळा आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांही उद्भवतात. व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना पुरेशी झोपही मिळत नाही, त्यातच तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं.

झोपेची नियमित वेळ ठरवा.

झोपेचे नियमित वेळापत्रक ठरवणे महत्त्वाचे आहे. दररोज एकाच वेळी झोपणे तुमच्या शरीराचे अंतर्गत जैविक घड्याळ रीसेट करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

झोपेच्या आधी ध्यान किंवा योगासनं करा.

रात्री झोपण्यापूर्वी ध्यान आणि योगासने करा. ही तंत्रे तुम्हाला शांती आणि आनंद मिळवण्यात मदत करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळू शकते.

झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या.

कोमट पाणी प्यायल्याने शारीरिक ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. तुम्ही कोमट दूध देखील पिऊ शकता.

झोपेच्या वेळी आजूबाजूला गोंगाट नसावा.

झोपेच्या वेळी आजूबाजूचा आवाज मंद असावा. मंद आवाजात तुम्हाला गाढ आणि शांत झोपण्यासाठी मदत होते. तुम्ही मंद आवाजात गाणी किंवा मंत्र ऐकू शकता. याशिवाय तुम्ही निसर्गाचा आवाजदेखील ऐकू शकता.

डिजिटल उपकरणांपासून दूर राहा.

चांगल्या झोपेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल उपकरणांपासून दूर राहा. झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही आणि कॉम्प्युटर वापरणं बंद करा. या उपकरणांमधील युव्ही किरण तुमच्या झोपण्याच्या क्षमतेवर परिणाम करु शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/dWRaftU Disorder : तुम्हीही झोपेत बडबड करताय? 'हे' असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण; दुर्लक्ष करु नका अन्यथा...

Sleeping Tips : रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही? मग 'हे' 5 उपाय करुन पाहा
सप्टेंबर ०९, २०२३
0
Tags