
केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग मधील बेकायदेशीर सट्टेबाजीवर बंदी घालण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. माहिती आणि प्रसार माध्यम मंत्रालयाने सर्व मीडिया प्लॅटफॉर्मला संबंधित जाहिराती न दाखवण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आय टी आणि दळणवळण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली.
राजीव चंद्रशेखर म्हणले की, आजपासून सट्टेबाजी बंद करण्यात आली आहे. ऑनलाईन खेळात बेटिंग करणे आता बेकायदेशीर मानले जाईल. ते म्हणाले की, जे ऑनलाईन गेम जुगार किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन देत आहेत, किंवा त्यावरून वापरर्त्यांचे नुकसान होणार असेल, यापैकी एकही घटक आढळून आला तर ते ॲप भारतात उपलब्ध होणार नाही.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, नियमात अशी तरतूद करण्यात आली आहे की गेम मध्ये ऑनलाईन सट्टेबाजी किंवा सट्टेबाजीचा कोणताही घटक उपलब्ध असेल, तर तो गेम इंडिया मध्ये उपलब्ध नसेल. त्याला परवानगी दिली जाणार नाही. याबाबत आम्ही संबंधितांशी चर्चा करूनच आयटी नियमामध्ये सुधारणा केल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले.
एकंदरीतच ड्रीम इलेवन, माय इलेवन सर्कल , रम्मी ॲप यासारखे ॲप बंद होण्याची शक्यता आहे, याबाबत अद्याप स्पष्ट काही सांगण्यात आलेले नाही, मात्र सट्टेबाजी होणारे ॲप नक्कीच बंद होणार आहेत.