अबब! चक्क 400 किलोची तिजोरी..
घराच्या खोदकामात सापडली तिजोरी यात जे सापडल ते बघून...
हैदराबाद: आंध्रप्रदेश मधील एक गावात जुन्या घराचे खोदकाम चालू असताना त्यांना एक वजनदार तिजोरी सापडली. घराच्या खोदकामात सापडलेल्या तिजोरीच वजन चक्क 400 किलो आहे. ज्याच्या मालकीच घर होते तो या आशेने खूप आनंदी झाला होता की आपल्याला हाती खूप मोठा खजिना लागला आहे.परंतु तिजोरी उघडल्या नन्तर त्यात जे काही दिसलं ते पाहून त्या कुटुंबाची अवस्था 'हसावे की रडावे ' अशी झाली होती.
खोदकामात मोठ्ठी तिजोरी सापडल्याची बातमी गावात
वाऱ्यासारखी पसरली न नागरिकांनी त्या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी केली.ज्याच्या जागेत ही तिजोरी सापडली त्यानं थेट पोलिसांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला.गॅस कटर ने तिजोरी चा टाळ तोडून पोलिसांच्या उपस्थितीत ती तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
टाळ तोडल्यानंतर ही तिजोरी पूर्णपणे उघडण्यात आली,तर त्यामध्ये चक्क कागदाची रद्दी,वाळू,लोखंड,स्टीलचे तुकडे अश्या वस्तू आढळून आल्या.काहीतरी मोठ्ठा खजीना बघायला मिळेल या आशेने जमा झालेले लोक निराश होऊन गेले.या नंतर तिथली गर्दी देखील कमी झाली.
सर्व कागदपत्रं बेकायदा
करिवेमुलाचे रहिवासी नरसिम्हुलु यांनी कृष्णा रेड्डींशी संबंधित एक जुनं घर खरेदी केलं होतं. त्याच जागी नवं घर बांधण्यासाठी त्यांनी हे तोडायलाही सुरुवात केली. मजुरांना पाया खोदताना लोखंडाची एक जुनी तिजोरी सापडली. इतर मजुरांच्या मदतीनं त्यांनी ही तिजोरी बाहेर काढली कारण याचं वजन सुमारे ४०० किलो इतकं होतं. यामुळं मात्र संपूर्ण गावात लोखंडी तिजोरीची माहिती पसरली. तसेच या तिजोरीत काय असेल या उत्सुकतेपोटी सर्व लोक बाहेर जमा झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर मंगळवारी महसूल अधिकारी आणि पोलिसांनी तीन तासांनंतर ही तिजोरी उघडली. यानंतर अधिकाऱ्यांना यामध्ये काही जुनी कागदपत्रे आणि वाळू मिळाली. पण ही कागदपत्रे तपासल्यानंतर ती देखील अवैध असल्याचं स्पष्ट झालं आहे.