![]() |
मुंबई - साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा २: द रुल' चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे.या भागात भरपूर ऍक्शन आणि मसाला पाहायला मिळणार असल्याने त्याचे चाहते आत्ता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटातील त्याच्या स्टाइलची, डायलॉगची चाहत्यांना भूरळ पडली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक महिने उलटल्यानंतरही पुष्पाची क्रेझ आजही कायम आहे.
तर टीझरची सुरुवात ‘पुष्पा’च्या शोधात पोलीस दिसत आहे. जंगल, शहर, शेतं, गल्ल्या आणि पोलीस ‘पुष्पा’ कुठे शोधत आहेत हेच कळत नाही. आणि ‘पुष्पा’ गायब आहे. जनतेचा मसिहा, पण पोलिसांसाठी चोर ‘पुष्पा’ गुन्हेगारापेक्षा कमी नाही. तर ‘पुष्पा’चे चाहते तिच्या नावाने घोषणा देत आहेत. तर दुसरीकडे पोलिस त्यांच्यावर लाठीमार करत आहेत आणि पाण्याचा वर्षाव करत आहेत. ‘पुष्पा’ कुठे आहे हे विचारत ती सगळीकडे फिरत असते.ट्रेलर पाहुन असे वाटते की बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2- द रुल' धुमाकूळ घालेल.