कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय: आई वडिलांपासून वेगळे करणे ही क्रूरताच
पत्नीने आपल्या पतीला भित्रा किंवा बेरोजगार म्हणणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी हा एक मजबूत आधार असू शकतो, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने एका निकालात नोंदवले आहे.
न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा लग्नानंतर आईवडिलांसोबत राहतो. जर त्याची पत्नी त्याला त्याच्या पालकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यामागे काही योग्य कारण असायला हवे.
पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या कारणावरून पतीला कौटुंबिक न्यायालयाने २००९ मध्ये घटस्फोट मंजूर केला होता. या आदेशाला पत्नीने आव्हान देत न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती.
खंडपीठाने म्हटले की, घरगुती मुद्द्यांवर अहंकाराचा संघर्ष आणि या प्रकरणात आर्थिक गरजा पूर्ण करण्याशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त, पत्नीने पतीला विभक्त होण्यासाठी कोणतेही समाधानकारक कारण नाही. या प्रकरणात पत्नीच्या छळाला कंटाळून मुलगा आईवडिलांना सोडून भाड्याच्या घरात राहायला गेला होता.
जर महिलेने पतीवर आईवडिलांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव आणला तर हेही घटस्फोटाचे कारण ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तो पतीला अधिकार...
खंडपीठाने म्हटले की, भारतीय संस्कृतीत आईवडील आणि मुलांचे नाते अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि समाजात प्रचलित असलेल्या प्रथांनुसार मुलाने आपल्या पालकांची काळजी घेणे स्वाभाविक आहे. परंतु, जर मुलाच्या लग्नानंतर त्याची पत्नी सामाजिक प्रथा किंवा नियम मोडून मुलाला असहाय पालकांच्या कुटुंबापासून दूर नेत असेल किंवा त्याला इतरत्र राहण्यास भाग पाडत असेल तर अशा पत्नीला घटस्फोट देण्याचा पतीला अधिकार आहे. कारण, ते आपल्या समाजाच्या नियमित प्रथेच्या विरोधात आहे.
पत्नी अतिशय भांडखोर
पतीचे म्हणणे असे होते की, त्याची पत्नी त्याला भित्रा आणि बेरोजगार म्हणते तसेच अगदी क्षुल्लक गोष्टीवरून भांडण करत राहते. याच वेळी ती त्याला त्याच्या आईवडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होती. खंडपीठाने पत्नीच्या असभ्य वर्तनाच्या अनेक उदाहरणांचा उल्लेख केला. ज्यामध्ये पती आणि त्याच्या आईवडिलांसोबत ती सतत भांडण करत होती.