Type Here to Get Search Results !

गाईपेक्षा म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर..

 गाईपेक्षा म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर..


गाईपेक्षा म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर..


आपल्या देशात गाईला गौमाता म्हणून पूजले जाते. त्यामुळे गाईच्या दुधापासून ते गोमुत्रापर्यंत अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.लग्न ,पूजा अथवा इतर कोणतेही शुभकार्य असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते.परंतु आता एका संशिधानातून असा दावा करण्यात आला आहे की गाईपेक्षा म्हशीचे मूत्र अधीक फायदेशीर आहे.असे देशातील प्रमुख संस्था भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थानने स्पष्ट केले आहे..

गोमूत्र पिणे धोकादायक...

गोमूत्र पिल्याने अनेक आजार होऊ शकतात;परंतु त्याने अनेक आजार बरे होतात असा अनेकांचा दावा आहे.मात्र ते मानवासाठी धोकादायक ठरू शकते.गाईच्या दुधात प्रोटिन्स असतात, मात्र गोमूत्रामध्ये तसे नसते. त्यामुळे गोमूत्राचे सेवन करणे टाळावे.


म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर...

हायपरटेन्शन आणि किडनीच्या रुग्णांना म्हशीचे मूत्र आयुर्वेदिक पद्धतीने पिण्याचा सल्ला दिला जातो. एका संशोधनात गाय आणि म्हशीच्या मूत्रांची सँपल घेण्यात आली. त्यांमध्ये असे आढळले की, म्हशीचे मूत्र हे अधिक फायदेशीर ठरते. बरेलीस्थित ‘भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थान’ या देशातल्या प्रमुख प्राणी-संशोधन संस्थेने या गोष्टीचा खुलासा केला आहे. या संस्थेने केलेल्या संशोधनात ताज्या गोमूत्रात धोकादायक जिवाणू असल्याचे समोर आले आहे. संस्थेतल्या तीन पीएच.डी. केलेल्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार निरोगी गाई आणि बैलांमध्ये कमीतकमी १४ प्रकारचे हानिकारक किटाणू असतात, यामुळे पोटाचे संसर्ग होऊ शकतात. या संस्थेच्या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्चगेट या ऑनलाइन संशोधन वेबसाइटवर प्रकाशित केले गेले आहेत.

दरम्यान, याचप्रमाणे गाईचे दूध उत्तम की म्हशीचे याबाबत अनेक जणांना शंका असते,  गाईचे दूध उत्तम की म्हशीचे याबद्दल जाणून घेऊया…



गाईच्या दुधातील आणि म्हशीच्या दुधातील फरक –

• गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा कमी फॅट असते. गाईच्या दुधात ३ ते ४ टक्के फॅट असते, तर म्हशीच्या दुधात ७ ते ८ टक्के फॅट असते.

• गाईच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण कमी असते, तर म्हशीच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.

• म्हशीच्या दुधात जास्त कॅलरीज असतात, तर गाईच्या दुधात कमी कॅलरीज असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गाईचे दूध प्यावे.

• गाईचे दूध पातळ असते. त्यात ९० टक्के पाणी असते, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. याउलट म्हशीचे दूध घट्ट असते आणि पचायला जड असते.

• दुधात अनेक पोषक तत्त्वे आढळतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीनुसार कोणते दूध प्यायचे हे ठरवावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.