Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मिळतात 5000 रु,कसे ते जाणून घ्या...

 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मिळतात 5000 रु,कसे ते जाणून घ्या...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मिळतात 5000 रु


प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे.जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते.महिलांना हफ्त्यांमध्ये मदत दिली जाते.जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असेल, तर तिला अतिरिक्त 1000 रुपये म्हणजेच एकूण 6000 रुपये दिले जातात.जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.लाभार्थीला ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात टाकली जाते.

ज्या महिला रोजंदारीवर काम करत आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे, त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भधारणेदरम्यान मजुरी करता न आल्याने होणारे नुकसान टाळणे हा आहे.


   कसा मिळतो योजनेचा लाभ

• या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 5000 रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात.

• जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1000 रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6000 रुपये पात्र महिलेला दिले जातात.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत दिले जाणारे रक्कम खालीलप्रमाणे:

पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दुसरा हप्ता : गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, 2000 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.

तिसरा हप्ता : 2000 चा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.


या योजनेचा लाभ पहिल्या हयात असलेल्या बालकालाच दिला जातो. हे 5000 रुपये गर्भवती महिलेला उपचार आणि औषधांच्या खर्चात मदत करतात. तसेच ही आर्थिक मदत मिळाल्याने गरोदर महिलांना विश्रांतीसाठी वेळ मिळतो.

कसा करणार अर्ज

फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी, तुम्हाला महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/ वर जाऊन अर्ज करण्याचे फॉर्म मिळवावा लागेल. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्ही अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जाऊन त्यांची मदत घेऊन ते डाउनलोड करू शकता.

फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनाची पात्रता

• अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

• या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो.

• गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.

• राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार.

• लाभार्थी आणि त्‍याच्‍या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.


योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

• लाभार्थी महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती पत्र द्यावे लागेल.

• मोबाईल नंबर - मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.

• बँक खाते तपशील

• MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)


• लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र)

• दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, गर्भधारणेच्या 6 महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत

• तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड.

रक्कम मिळाली की नाही ते कसे तपासणार

• प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmmvy-cas.nic.in वर जा.

• लॉगिन फॉर्म उघडा.

• आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन करा.

• लॉगिन केल्यानंतर, लाभार्थीची स्थिती जाणून घ्या.

• लाभार्थीचा आधार क्रमांक टाका आणि सर्च करा.

• पेमेंट स्थिती तपासा आणि तुमचे पेमेंट रिपोर्ट डाउनलोड करा.

banner

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.